उंबरठे झिजविले, मात्र ऑक्सिजन बेड मिळत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 12:17 AM2021-04-20T00:17:25+5:302021-04-20T00:17:35+5:30
कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाइकांनी फाेडला टाहाे
आविष्कार देसाई
लोकमत न्यूज नेटवर्क
रायगड : साहेब...रेमडेसिविर इंजेक्शन काेठेच भेटत नाही. डाॅक्टर सांगतात इंजेक्शन देणे गरजेचे आहे. रुग्णालयांचे उबंरठे झिजवले मात्र काेठेच ऑक्सीजन बेड उपलब्ध झाला नाही. वेळेत बेड मिळाला नाही तर, त्याच्या ीजिवाला धाेका पाेहोचेल. तातडीने ऑक्सिजन बेडची व्यवस्था करा... यासह अनेक कारणांसाठी जिल्ह्याच्या वाॅररूममध्ये २४ तास फाेन खणखणत आहे. प्रत्येक येणाऱ्या काॅलला प्रतिसाद देऊन समाेरच्याचे समाधान करेपर्यंत संबंधित कर्मचाऱ्यांची मात्र चांगलीच दमछाक हाेत आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये काेराेना रुग्णांची विस्फाेटक परिस्थिती निर्माण झाली आहे. दर दिवसाला बाराशे रुग्ण सापडत आहेत. वाढणाऱ्या रुग्णसंख्येला आळा घालताना सरकार आणि प्रशासनाची चांगलीच कसरत हाेत आहे. आराेग्य सुविधा अपुऱ्या पडत असल्याने रुग्णांचे नातेवाईक सरकार आणि प्रशासनाच्या नावाने खडे फाेडत आहेत. मात्र प्रशासन आणि सरकार दाेघेही हतबल असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील काेराेना रुग्णांची हाेणारी हेळसांड थांबविण्यासाठी अथवा त्यांना याेग्य मार्गदर्शन करण्यासाठी वाॅररूम निर्माण करण्यात आले आहेत. अलिबाग येथील जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात १५ जणांची टीम या वाॅररूममध्ये कार्यरत आहे. या ठिकाणी २४ तास हेल्पलाइनची सुविधा देण्यात आली आहे. येणारा प्रत्येक काॅल रिसिव्ह करून समाेरच्याला आवश्यक ती मदत देण्याचा प्रयत्न या वाॅररूमचे कर्मचारी करत आहेत. रेमडेसिविर इंजेक्शन काेठेच मिळत नाही. डाॅक्टर सांगतात रुग्णाला रेमडेसिविर इंजेक्शन देणे गरजेचे आहे. आता काय करायचे आम्ही...यासह ऑक्सिजन बेड काेठेच भेटत नाही. रुग्णांची ऑक्सिजनची पातळी खालावत आहे. वेळेवर ऑक्सिजन बेड मिळाला नाही तर, त्याच्या जिवाला धाेका निर्माण हाेईल. साहेब, लवकर काही तरी करा... अशा विविध प्रकारचे फाेन सातत्याने वाॅररूममध्ये खणखणत आहेत. संबंधितांना उत्तरे देताना मात्र कर्मचारी आणि अधिकारी यांची चांगलीच दमछाक हाेत आहे.
अलिबागच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात वाॅररूम कार्यान्वित करण्यात आला आहे. नियुक्त कर्मचाऱ्यांनी औषध निरीक्षकांशी संपर्क व समन्वय ठेवून रेमडेसिविर इंजेक्शन उत्पादक कंपन्यामार्फत स्टॉकिस्ट यांना पुरविण्यात आलेल्या रेमडेसिविर इंजेक्शन साठ्याची माहिती घेणे, त्याच्या नाेंदी ठेवणे गरजेचे आहे.
रेमडेसिविर इंजेक्शनबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारी व हॉस्पिटलनिहाय मागणी याबाबत नोंदी ठेवणे तशी माहिती संकलित करणे आणि ही माहिती रायगड अन्न व औषध प्रशासनास कळविणे.
रेमडेसिविरचा काळाबाजार राेखणे, तसेच याेग्य त्या प्रमाणात रेमडेसिविरचा वापर हाेत आहे की नाही, यासाठी वाॅररूम निर्माण करण्यात आलेली आहे. दिवसाला १०० हून अधिक काॅल येतात. रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन बेड मिळत नसल्याच्या नागरिकांच्या सर्वाधिक तक्रारी आहेत.
- सागर पाठक,
आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, रायगड
कोणाला रेमडेसिविर इंजेक्शन पाहिजे, तर काेणाला ऑक्सिजन
वाॅररूमचा फोन सातत्याने खणखत असताे. साहेब, रेमेडेसिविर इंजेक्शन काेठेच मिळत नाही, डाॅक्टर सांगतात की इंजेक्शन देणे गरजेचे आहे. काय करायचे आम्ही आमच्या रुग्णाला असेच वाऱ्यावर साेडायाचे का, ऑक्सिजन बेड काेठेचे शिल्लक नाही. रुग्णालयाचे उंबरठे झिजवले, मात्र बेड काही मिळाला नाही. रुग्णाची ऑक्सिजन पातळी खालावत आहे. वेळेवर ऑक्सिजन बेड मिळाला नाही तर, जिवाला धाेका निर्माण हाेईल.