पनवेल : गेली अनेक वर्षे वनरक्षक व वनपाल यांच्या विविध मागण्या सरकार दरबारी प्रलंबित आहेत. पनवेलमधील वनरक्षक-वनपाल यांच्या विविध मागण्यांचे निवेदन वनक्षेत्रपाल एन. सोनावणे यांच्याकडे जिल्हाधिकाºयांच्या नावे वनपाल संघटनेचे उपाध्यक्ष सुनील कापसे व कर्मचारी पाटील, नेवरेकर, माने, लेंडे, चव्हाण यांनी गुरुवारी दिले आहे. मागण्या मंजूर न झाल्यास ११ डिसेंबर रोजी राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.वनरक्षक-वनपाल यांचे विविध मागण्यांसाठी राज्यभर असहकार आंदोलन सुरू आहे. वेतनश्रेणीत सुधारणा, विविध भत्ते, पदोन्नती, कुटुंब नियोजन योजना, अर्जित रजा, वनसंरक्षण करताना मृत्यू ओढवल्यास २५ लाख नुकसानभरपाई आदी मागण्यांसाठी वनरक्षक-वनपाल संघटनेने आंदोलन सुरू केले आहे. रायगड जिल्ह्यातील वनपालसुद्धा या आंदोलनात सहभागी झाले आहेत. आंदोलनाचे स्वरूप सध्या असहकाराचे असून सुटी दिवशी काम न करणे, नियतक्षेत्रातील वन क्षेत्ररक्षणाव्यतिरिक्त कोणतेही काम न करणे, बीट मदतगाराशिवाय बीटवर न जाणे, जीपीएस पीडीए यंत्रणेची कामे न करणे, शासनाच्या वृक्षलागवड कार्यक्र मास सहकार्य न करणे असा पवित्रा वनरक्षकांनी घेतला आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्यात येणार आहे.
वनरक्षक-वनपालांचे ११ डिसेंबरला धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 2:02 AM