मच्छीमारांवर उपासमारीची वेळ
By admin | Published: November 21, 2015 12:46 AM2015-11-21T00:46:34+5:302015-11-21T00:46:34+5:30
अलिबाग तालुक्यातील थेरोंडामधील आगल्याची, डोऱ्याची वाडी, बाजारपाडा व खंडेराव पाडा, वरसोलपाडा, रेवदंडा, चौल-आग्राव, तसेच मुरुड जंजिरा तालुक्यातील कोर्लई, साळाव आदी पंचक्रोशीतील
रेवदंडा : अलिबाग तालुक्यातील थेरोंडामधील आगल्याची, डोऱ्याची वाडी, बाजारपाडा व खंडेराव पाडा, वरसोलपाडा, रेवदंडा, चौल-आग्राव, तसेच मुरुड जंजिरा तालुक्यातील कोर्लई, साळाव आदी पंचक्रोशीतील मच्छीमार रेवदंडा-साळाव खाडीत परंपरागत मच्छीमारी व्यवसाय करत आहे. मात्र पर्सोनेटच्या माध्यमातून होणाऱ्या मच्छीमारीमुळे स्थानिक मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. पर्सोनेट मच्छीमारी बंद करण्यासाठी नुकतीच मच्छीमार संस्थेचे पदाधिकारी व मच्छीमार बांधव यांची सभा होवून मच्छीमारी बंद करण्यासाठी शुक्रवारी संबंधित कार्यालयांना निवेदने दिले आहे.
जय मल्हार कोळी समाज संघटनेने निवेदनात म्हटले आहे की, पर्सोनेटच्या मच्छीमारीमुळे छोट्या मच्छीमारांच्या जाळ्यांचे, होड्यांचे, ससांचे आदी साहित्याचे नुकसान होत असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय रायगड अलिबाग यांनी पर्सोनेट मासेमारीला बंदी आहे असे कळविले आहे. मात्र स्थानिक मच्छीमार पर्सोनेटमुळे चाललेल्या मच्छीमारीमुळे रस्त्यावर आला असून यावर शासनाने बंदी न आणल्यास मच्छीमारांनी उपोषणाचा निर्णय घेणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. (वार्ताहर)