वेळेच्या नियोजनात तीन तालुके फेल

By admin | Published: March 10, 2017 03:39 AM2017-03-10T03:39:56+5:302017-03-10T03:39:56+5:30

रायगड जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट अलिबाग, पेण आणि कर्जत तालुक्यांना निर्धारित वेळेत पूर्ण करता येणार नाही.

In time planning, three talukas fail | वेळेच्या नियोजनात तीन तालुके फेल

वेळेच्या नियोजनात तीन तालुके फेल

Next

- आविष्कार देसाई,  अलिबाग
रायगड जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट अलिबाग, पेण आणि कर्जत तालुक्यांना निर्धारित वेळेत पूर्ण करता येणार नाही. त्यामुळे मुदतवाढ देण्यावाचून प्रशासनासमोर पर्यायच नसल्याचे समोर आले आहे. ध्येयाचा पाठलाग करताना सुधागड, रोहे, माणगाव, पनवेल, खालापूर, मुरुड तालुक्यांची दमछाक होणार असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. स्वच्छ भारत अभियानाची डेडलाइन हुकू नये, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाला शर्तीचे प्रयत्न करावे लागणार आहेत.
देशभरात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. ताज्या आकडेवारीनुसार वैयक्तिक शौचालयांमध्ये रायगड जिल्ह्याचा पंधरावा क्रमांक लागतो, तर जिल्हा हागणदारीमुक्त करण्यात सातवा क्रमांक लागतो. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा दोन्ही बाबतीमध्ये अग्रेसर राहिला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि रत्नागिरी या जिल्ह्यांनी स्वच्छ भारत अभियानामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. स्वच्छ भारत अभियान मार्च २०१९पर्यंत राबविले जाणार असल्याने अद्यापही जिल्ह्याला स्पर्धेत टिकून राहण्याची संधी आहे. मात्र, त्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांना, लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य, विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, नागरिकांना झोकून देऊन काम करावे लागणार आहे.

- रायगड जिल्ह्याला ६१ हजार ५४० वैयक्तिक शौचालयाची निर्मिती करायची आहे. तळा, महाड, उरण, श्रीवर्धन, पोलादपूर, म्हसळा तालुक्यांतील वैयक्तिक शौचालयाचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.
- अलिबाग तालुक्याला दिवसाला ७९ शौचालय बांधावी लागणार आहेत, तर पेण तालुक्याला ७७ आणि कर्जत तालुक्याला ९७ शौचालयांची उभारणी करावी लागणार आहे. या तीन तालुक्यांना निर्धारित वेळेत काम पूर्ण करता येणार नाही. त्यामुळे वेळ वाढवून घेण्याची तयारी त्यांनी केली आहे.
- स्वच्छ भारत अभियानाचा आलेख गेल्या सहा महिन्यांत वाढला आहे. मुख्यकार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर यांनी सर्वांनाच फैलावर घेतल्याने सुमारे ४० हजार शौचालये या कालावधीत बांधून झाली आहेत, असे उपमुख्यकार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. नियोजित वेळेत अभियान पूर्ण करण्यावर भर देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
- अलिबाग, पेण आणि कर्जत तालुक्यांची अतिशय खराब कामगिरी आहे. त्यांना अनुक्रमे नऊ हजार ४२४, नऊ हजार २९७, आणि ११ हजार ६६० शौचालयांची उभारणी करायची आहे.
- सुधागड (४२३४), रोहे (६७३१), माणगाव (७६१६), पनवेल (७९८०), खालापूर (३६५१) आणि मुरुड तालुक्याला १८४७ शौचालयांचे उद्दिष्ट गाठायचे आहे.
- या तालुक्यांचे काम समाधानकारक नाही.

Web Title: In time planning, three talukas fail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.