काळ नदी किनाऱ्यावरील 25 जणांना वाचवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 12:15 PM2020-08-05T12:15:05+5:302020-08-05T12:15:09+5:30

रायगड जिल्ह्याला 4 ते 6 ऑगस्ट या कालावधीत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

Time saved 25 people on the river bank | काळ नदी किनाऱ्यावरील 25 जणांना वाचवले

काळ नदी किनाऱ्यावरील 25 जणांना वाचवले

googlenewsNext

लोकमत न्युज नेटवर्क

रायगड : माणगाव तालुक्यातील गोरेगावजवळील काळ नदीकिनारी असलेल्या फार्महाऊसवर अडकलेल्या 25 जणांना वाचवण्यात आले आहे, 4 ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली,

रायगड जिल्ह्याला 4 ते 6 ऑगस्ट या कालावधीत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे, सतत बरसणाऱ्या पावसाने येथील नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडली आहे. माणगाव तालुक्यातील काळ नदीला पूर आल्यामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी भरले.  गोरेगावनजीक काळ नदी किनारी धरणाजवळ असलेल्या वेळासकर फार्महाऊसमध्ये अडकलेल्या 25 नागरिकांना रेस्क्यू करण्यात आले. या फार्महाऊसमध्ये वेळासकर कुटुंब आणि त्यांचे सहकारी वास्तव्यास होते. परंतु, अतिवृष्टीमुळे काळ नदी पात्रातील पाण्याची पातळी अचानक वाढल्याने वेळासकर कुटुंबीय अडकून पडले होते.

पोलीस प्रशासन, रोहा तालुक्यातील महेश सानप यांची रेस्क्यू टीम आणि स्थानिक लोकांच्या मदतीने बोटीच्या साह्याने त्यांना वाचवण्यात आले

Web Title: Time saved 25 people on the river bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.