कोट्यवधींचे पाणीबिल थकीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 03:41 AM2018-05-02T03:41:40+5:302018-05-02T03:41:40+5:30
तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींकडे पाणी बिलापोटी मार्च महिन्याअखेरपर्यंत २१ कोटी ४७ लाख १९ हजार १०१ रुपयांची थकबाकी असल्याची माहिती एमआयडीसीचे उपअभियंता आर. डी. बिरंजे यांनी दिली.
उरण : तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींकडे पाणी बिलापोटी मार्च महिन्याअखेरपर्यंत २१ कोटी ४७ लाख १९ हजार १०१ रुपयांची थकबाकी असल्याची माहिती एमआयडीसीचे उपअभियंता आर. डी. बिरंजे यांनी दिली.
उरण तालुक्यातील २५ ग्रा. पं. ना एमआयडीसीमार्फत रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जातो. पाण्याची बिले भरण्यास मात्र दिरंगाई केली जात आहे. ३१ मार्च २०१८ अखेरपर्यंत २४ ग्रा. पं.कडे २१ कोटी ४७ लाख १९ हजार १०१ रुपयांची थकबाकी आहे. त्यामध्ये सर्वाधिक ३ कोटी ७२ लाख ९७ हजार १८८ रुपये इतकी थकबाकी आहे. दुसऱ्या क्रमांकावर चिरनेर ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतीकडे २ कोटी ६४ लाख २९ हजार १५३ रुपयांची थकबाकी आहे, तर तिसºया क्रमांकावर नवीन शेवा ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतीकडे २ कोटी १४ लाख ३१ हजार ४६८ रुपयांची थकबाकी आहे. चाणजे-२ (जीपीपीएस बालई) ९५ हजार १९८ अशा २४ ग्रामपंचायतींकडे २१ कोटी ४७ लाख १९ हजार १०१ रुपयांची थकबाकी आहे.
अनेक ग्रा. पं. आर्थिक उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून सधन समजल्या जात आहेत. अशा ग्रा. पं. नागरिकांकडून पाणीपट्टीची रक्कमही नियमितपणे वसूल करतात. मात्र अशा सधन समजल्या जाणाºया ग्रामपंचायतीच थकबाकीदार म्हणून आघाडीवर आहेत. याबाबत नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
एमआयडीसीकडून सातत्याने होणारा अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठ्यामुळे पाण्याची थकीत बिले तरी भरावी कशी अशी विचारणा काही ग्रा. पं. कडून केली जात आहे. मात्र ठरवून दिलेल्या कोट्याप्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा केला जात असल्याचा दावा उपअभियंता आर. डी. बिरंजे यांनी केला.
थकबाकीधारक ग्रामपंचायती
ग्रामपंचायत थकबाकी
नवीन शेवा २ कोटी १४ लाख ३१ हजार ४६८
हनुमान कोळीवाडा २२ लाख ३० हजार ३१
चिरनेर २ कोटी ६४ लाख २९ हजार १५३
खोपटा कनेक्शन ६ लाख ४७ हजार ४४४
दिघोडे १ कोटी २२ लाख २ हजार १२९
करळ ४८ लाख ८२ हजार १२१
धुतूम ६७ लाख ५५ हजार ५४७
जसखार ७३ लाख ४७ हजार १०१
बोकडविरा १ कोटी २९ लाख १४ हजार ६१४
फुंडे १ कोटी ८४ लाख २ हजार २९९
सावरखार २१ लाख ६० हजार ५४७
दादरपाडा १८ लाख ३ हजार ३६
वेश्वी १ कोटी ७ लाख १३ हजार ८८४
डोंगरी २८ लाख ९० हजार १०३
सोनारी ४५ लाख ६६ हजार १४६
नागाव ७३ लाख २९ हजार ३३८
चाणजे ३ कोटी ७२ लाख ९७ हजार १८८
चिर्ले १ कोटी २८ लाख ४८ हजार ९५९
रांजणपाडा ४ लाख ३१ हजार ९९
केगाव १ कोटी २५ लाख २ हजार ८८२
म्हातवली ६१ लाख ९४ हजार ६२३
पागोटे ६ लाख २४ हजार ६२३
नवघर २० लाख १९ हजार ३६०