उरण : तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींकडे पाणी बिलापोटी मार्च महिन्याअखेरपर्यंत २१ कोटी ४७ लाख १९ हजार १०१ रुपयांची थकबाकी असल्याची माहिती एमआयडीसीचे उपअभियंता आर. डी. बिरंजे यांनी दिली.उरण तालुक्यातील २५ ग्रा. पं. ना एमआयडीसीमार्फत रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जातो. पाण्याची बिले भरण्यास मात्र दिरंगाई केली जात आहे. ३१ मार्च २०१८ अखेरपर्यंत २४ ग्रा. पं.कडे २१ कोटी ४७ लाख १९ हजार १०१ रुपयांची थकबाकी आहे. त्यामध्ये सर्वाधिक ३ कोटी ७२ लाख ९७ हजार १८८ रुपये इतकी थकबाकी आहे. दुसऱ्या क्रमांकावर चिरनेर ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतीकडे २ कोटी ६४ लाख २९ हजार १५३ रुपयांची थकबाकी आहे, तर तिसºया क्रमांकावर नवीन शेवा ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतीकडे २ कोटी १४ लाख ३१ हजार ४६८ रुपयांची थकबाकी आहे. चाणजे-२ (जीपीपीएस बालई) ९५ हजार १९८ अशा २४ ग्रामपंचायतींकडे २१ कोटी ४७ लाख १९ हजार १०१ रुपयांची थकबाकी आहे.अनेक ग्रा. पं. आर्थिक उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून सधन समजल्या जात आहेत. अशा ग्रा. पं. नागरिकांकडून पाणीपट्टीची रक्कमही नियमितपणे वसूल करतात. मात्र अशा सधन समजल्या जाणाºया ग्रामपंचायतीच थकबाकीदार म्हणून आघाडीवर आहेत. याबाबत नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.एमआयडीसीकडून सातत्याने होणारा अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठ्यामुळे पाण्याची थकीत बिले तरी भरावी कशी अशी विचारणा काही ग्रा. पं. कडून केली जात आहे. मात्र ठरवून दिलेल्या कोट्याप्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा केला जात असल्याचा दावा उपअभियंता आर. डी. बिरंजे यांनी केला.थकबाकीधारक ग्रामपंचायतीग्रामपंचायत थकबाकीनवीन शेवा २ कोटी १४ लाख ३१ हजार ४६८हनुमान कोळीवाडा २२ लाख ३० हजार ३१चिरनेर २ कोटी ६४ लाख २९ हजार १५३खोपटा कनेक्शन ६ लाख ४७ हजार ४४४दिघोडे १ कोटी २२ लाख २ हजार १२९करळ ४८ लाख ८२ हजार १२१धुतूम ६७ लाख ५५ हजार ५४७जसखार ७३ लाख ४७ हजार १०१बोकडविरा १ कोटी २९ लाख १४ हजार ६१४फुंडे १ कोटी ८४ लाख २ हजार २९९सावरखार २१ लाख ६० हजार ५४७दादरपाडा १८ लाख ३ हजार ३६वेश्वी १ कोटी ७ लाख १३ हजार ८८४डोंगरी २८ लाख ९० हजार १०३सोनारी ४५ लाख ६६ हजार १४६नागाव ७३ लाख २९ हजार ३३८चाणजे ३ कोटी ७२ लाख ९७ हजार १८८चिर्ले १ कोटी २८ लाख ४८ हजार ९५९रांजणपाडा ४ लाख ३१ हजार ९९केगाव १ कोटी २५ लाख २ हजार ८८२म्हातवली ६१ लाख ९४ हजार ६२३पागोटे ६ लाख २४ हजार ६२३नवघर २० लाख १९ हजार ३६०
कोट्यवधींचे पाणीबिल थकीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2018 3:41 AM