चवदार तळे सत्याग्रहाचा आज ९२ वा वर्धापन दिन, महाडमध्ये भीमसागर लोटणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 06:41 AM2019-03-20T06:41:30+5:302019-03-20T06:41:45+5:30
जातीयवादाची दरी संपुष्टात यावी, यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह करून सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले
महाड - जातीयवादाची दरी संपुष्टात यावी, यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह करून सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले, त्या ऐतिहासिक घटनेच्या स्मृतीनिमित्त बुधवारी चवदार तळे सत्याग्रहाचा ९२ वा वर्धापनदिन महाडमध्ये साजरा केला जाणार आहे. यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातून आंबेडकरप्रेमी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
याप्रसंगी रिपाइंचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भारिप नेते प्रकाश आंबेडकर, पीआरपीचे प्रा. जोगेंद्र कवाडे, बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आनंदराज आंबेडकर आदी उपस्थित राहणार आहेत.
बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेतर्फे ११ मार्चपासून चवदार तळे येथे सुरू असलेल्या श्रामणेर शिबिराचा समारोप बुधवारी होणार असून, या कार्यक्र माला मीरा आंबेडकर उपस्थित राहणार आहेत. चवदार तळे, तसेच क्रांतिभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ््यास अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी होणार आहे. महाड नगरपरिषदेकडून यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या असून, प्रशासन सज्ज आहे.