चवदार तळे सत्याग्रहाचा आज ९१वा वर्धापन दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 01:34 AM2018-03-20T01:34:39+5:302018-03-20T01:34:39+5:30
भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी चवदार तळ्याचा सत्याग्रह करून सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले त्या ऐतिहासिक घटनेचा ९१वा वर्धापन दिन मंगळवारी महाडमध्ये साजरा करण्यात येणार आहे.
महाड (रायगड) : भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी चवदार तळ्याचा सत्याग्रह करून सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले त्या ऐतिहासिक घटनेचा ९१वा वर्धापन दिन मंगळवारी महाडमध्ये साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भीमसैनिक महामानवाला अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. कोरेगाव भीमा येथे नुकत्याच घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून विशेष दक्षता घेतली जात असून प्रशासन सज्ज झाले आहे. चवदार तळे तसेच क्र ांती स्तंभ आदी ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष तथा भारिप बहुजन संघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, जोगेंद्र कवाडे, आनंदराज आंबेडकर आदी रिपब्लिकन नेत्यांच्या सभा होणार आहेत. यासाठी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले आदी मंत्री उपस्थित राहणार आहेत. विविध ठिकाणाहून येणाऱ्या भीमसैनिकांसाठी बंदर नाका येथून एसटी बसेसची व्यवस्था महाड एसटी आगाराकडून करण्यात आली आहे.