प्रचारार्थ आज मुख्यमंत्री उलवेमध्ये
By Admin | Published: February 15, 2017 04:51 AM2017-02-15T04:51:28+5:302017-02-15T04:51:28+5:30
रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व आरपीआय (आठवले गट) युतीच्या
पनवेल : रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व आरपीआय (आठवले गट) युतीच्या प्रचारार्थ बुधवार, १५ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उलवा नोडमध्ये जाहीर सभा होणार आहे. पनवेल तालुक्यातील उलवा नोड, सेक्टर १९ मधील भूमिपुत्र भवनासमोरील मैदानावर दुपारी अडीच वाजता ही सभा आयोजित केली आहे.
माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सभेस प्रमुख मान्यवर म्हणून रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश महेता, जिल्हा संपर्कप्रमुख आमदार प्रवीण दरेकर, जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण पाटील, जी. आर. पाटील, नंदराज मुंगाजी, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा कल्पना राऊत यांची प्रमुख उपस्थिती असल्याची माहिती भाजपाचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण भगत, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर यांनी दिली.