आज खोपोली बंद, व्यापाऱ्यांचा प्लॅस्टिकबंदीला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 05:00 AM2018-10-05T05:00:33+5:302018-10-05T05:01:08+5:30
महाराष्ट्र शासनाच्या प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी खोपोली नगर परिषदेने व्यापाºयांवर लगाम कसायला घेतल्याने, व्यापारी आक्र मक झाले
खोपोली : महाराष्ट्र शासनाच्या प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी खोपोली नगर परिषदेने व्यापाºयांवर लगाम कसायला घेतल्याने, व्यापारी आक्र मक झाले असून आम्ही व्यापार करायचा की दंड भरायचा हा सवाल उपस्थित करून शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी अवघ्या काही मिनिटातच शटर्स खाली ओढली आणि एकत्रितरीत्या त्यांनी लोहाणा समाज हॉलच्या पटांगणात ठाण मांडून या कृतीचा निषेध केला.
अनेक कारणांमुळे त्रस्त असलेल्या व्यापारी वर्गाला प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाने खूप घोर लावला असून त्यांच्याकडे स्टॉकमध्ये असलेल्या प्लॅस्टिक पॅकिंगवर देखील आता पालिकेची नजर पडली आहे आणि त्यासाठी त्यांनी दंड आकारण्यास सुरवात केली आहे.
व्यापाऱ्यांचा सर्व व्यवहार लिंकमध्ये असतो, कारण त्यांच्याकडे आलेला माल हा कोणा अन्य माध्यमातून आलेला असतो त्याचे पॅकिंग बदलायचे, त्यासाठी कोणता घटक वापरायचा हे देखील शासनाने सुचविलेले नाही. इतकेच काय तर काही दिवसांंपासून रंगीबेरंगी कापड सदृश पिशव्या बाजारात खुलेआम पॅकिंगकरिता वापरल्या जात होत्या, त्यावर देखील बंदी आणलेली आहे. विशेष म्हणजे या पिशव्या खोपोली नगर परिषदेचा लोगो लावून वितरित केल्या गेल्या होत्या.
महाराष्ट्र शासन व्यापाºयांच्या मागे हात धुवून लागले आहे त्यामुळे धंदा करायचा की नियमांच्या बदलात आपल्याला गुंतवून घ्यायचे हे व्यापाºयांना समजेनासे झालेले आहे. राज्य पातळीवरील व्यापारी संघटनेच्या माध्यमातून संघर्ष करण्याची त्यांनी तयारी ठेवली आहे. खोपोलीच्या व्यापाºयांनी अत्यावश्यक सेवेपासून सर्वच व्यापार उद्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.