जनजागृतीसाठी आज ‘मध्यस्थी’चा परिसंवाद

By admin | Published: June 10, 2017 01:17 AM2017-06-10T01:17:08+5:302017-06-10T01:17:08+5:30

दिवसेंदिवस आपली सहनशीलता कमी होते आणि कायदेशीर खटल्यांची वाढ अत्यंत वेगाने होतेय. या खटल्यांमध्ये आपली

Today 'Mediation' seminar for public awareness | जनजागृतीसाठी आज ‘मध्यस्थी’चा परिसंवाद

जनजागृतीसाठी आज ‘मध्यस्थी’चा परिसंवाद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : दिवसेंदिवस आपली सहनशीलता कमी होते आणि कायदेशीर खटल्यांची वाढ अत्यंत वेगाने होतेय. या खटल्यांमध्ये आपली सामाजिक प्रतिष्ठा पणाला लागते. आपला पैसा, अमूल्य वेळ आणि जीवनाचा आनंद खर्ची पडतो. ‘तडजोड’ करणे आपल्याला कमीपणाचे वाटते अन् आपले आयुष्य खरोखरीच उजाड होते. नातेसंबंधात दुरावा निर्माण होतो. न्यायालय हे न्याय मिळवण्याचे ठिकाण असून तिथे फक्त अनिवार्य प्रकरण दाखल करायचे असते. याचे भान व जाणीव सर्वांना नाही, म्हणूनच सर्व लोकांनी न्यायालयाचा अनावश्यक भार टाळण्यासाठी हातभार लावायला हवा. ‘मध्यस्थी’चा पुरस्कार व जनजागृती करून, या सामाजिक कार्यात सामील व्हा, असे आवाहन इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ आर्बिट्रेशन अ‍ॅण्ड मेडिएशन या संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. याबाबत जनजागृतीसाठी या संस्थेच्या वतीने पनवेलमध्ये १० जूनला एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.‘लोकमत’ या कार्यक्रमाचे माध्यम प्रयोजक आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ आर्बिट्रेशन अ‍ॅण्ड मेडिएशन संस्था ही खासगी मध्यस्थीचे काम २००१पासून प्रभावीपणे करत आहे. अशा प्रामाणिक मध्यस्थी व्यक्तींकडून येत्या १० जून रोजी पनवेल येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
लिगल इंटेग्रिटी एलएलपी या संस्थेने यासाठी पुढाकार घेतला आहे. पनवेल येथील के. वि. कन्या विद्यालय, कोकण एज्युकेशन सोसायटी कॅम्पस येथे मध्यस्थी या संकल्पनेच्या जनजागृतीसाठी परिसंवाद व मध्यस्थीद्वारे वाद निराकरण विनामूल्य शिबिर आयोजित केले आहे.

Web Title: Today 'Mediation' seminar for public awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.