अलिबाग : डीजेवाल्यांचा आवाज डेसिबलच्या कचाट्यात सापडला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील सुमारे चार हजार २०० व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या विरोधात प्रोफेशनल आॅडिओ अॅण्ड लाइट असोसिएशन १५ आॅगस्टला ‘म्युट डे’ पाळणार आहे. या अनोख्या आंदोलनामध्ये डीजे व्यावसायिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन असोसिएशनने केले आहे.महाराष्ट्र राज्य विविध सण साजरे करणारे राज्य आहे. येथे विविध भाषिक आनंदाने राहतात. एकमेकांच्या सणामध्ये सामील होऊन त्यांचे सण जल्लोषात साजरे करतात. सण साजरे करताना पूर्वी पारंपरिक वाद्ये वाजवली जायची, मध्यंतरी ती काही कालावधीकरिता लुप्त झाली होती. त्यांची जागा डीजेने घेतली. डीजेचा दणदणाट तरु णाईला हवाहवासा वाटू लागल्याने डीजे व्यावसायिकांची संख्या वाढत गेली. डीजेच्या व्यवसायामध्ये कोट्यवधी रु पयांचे अर्थकारण दडल्याने डीडेचा ट्रेंड वाढत गेला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या व्यवसायामध्ये गुंतवणूक वाढत गेली. त्यावर अवलंबून असणाºयांची संख्याही प्रचंड झाली आहे. तरु णाईला वेड लावणाºया डीजेच्या व्यावसायामध्ये काम करणाºया तरु णांची संख्याच अधिक असल्याचे दिसून येते.चांगला दर्जा असणारा एक डीजेचा सेट सुमारे १५ लाख रुपयांना बाजारामध्ये उपलब्ध आहे. रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे ७०० डीजे व्यावसायिक आहेत, तर प्रत्येकाकडे सुमारे सहा व्यक्ती काम करतात. अशी त्यांची एकूण संख्या ही चार हजार २०० आहे. या व्यवसायातून चांगला धंदा होत असल्याने काही तरु णांनी डीजे सेट घेण्यासाठी बँकांकडून लाखो रु पयांचे कर्ज घेतले आहे. सणासुदीच्या कालावधी त्यांचा धंदा तेजीत असतो. मात्र न्यायालयाने आवाजावर निर्बंध लादले आहेत. ६० डेसिबलपेक्षा अधिक आवाज झाल्यास पोलीस त्यांच्यावर कारवाई करीतआहेत.काही दिवसांनी गणेशोत्सव आणि त्यापाठोपाठ नवरात्रोत्सव येणार आहे. हा कालावधी तेजीचा असल्याने कोणत्याही डीजे व्यावसायिकाला तोट्यात जाणे परवडणारे नाही. आवाजाच्या मर्यादेबाबत रायगड जिल्ह्यातील डीजे व्यावसायिकांनी सोमवारी रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. तसेच जिल्हाधिकाºयांनाही निवेदन दिले असल्याचे डीजे व्यावसायिक स्वप्निल गाडे याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.आपण बोलताना साधारणत: ७० डेसिबल आवाज होतो. त्यामुळे डीजेवर ६० डेसिबलची मर्यादा कितपत योग्य आहे, असा प्रश्न स्वप्निल गाडे याने केला.ढोल ताशा, सनई चौघडे, खालू बाजा अशा पारंपरिक वाद्यांचा आवाजही ६० डेसिबलपेक्षा अधिक असतो, त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई होताना दिसत नाही, अशी खंत ऋ षिकेश चेऊलकर या तरु णाने ‘लोकमत’कडे व्यक्त केली.न्याय मिळावा यासाठी संघटनेमार्फत न्यायालयीन लढाई सुरु आहे, असेही गाडे याने स्पष्ट केले. या विरोधात पाला संघटनेमार्फत महाराष्ट्र राज्यामध्ये १५ आॅगस्ट रोजी म्युट डे पाळण्यात येणार असल्याचेही गाडे यांनी सांगितले.या अनोख्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने डीजे व्यावसायिकांनी सामील व्हावे, असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे. १५ आॅगस्टला सर्वत्र जल्लोष असणार मात्र डीजेवाल्यांचा आवाज बंद राहणार आहे.
आज डीजेवाल्यांचा ‘म्युट डे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 2:47 AM