पेणमध्ये पाण्यासाठी आजपासून संघर्ष यात्रा

By Admin | Published: February 14, 2016 03:02 AM2016-02-14T03:02:13+5:302016-02-14T03:02:13+5:30

हेटवण्याची गंगा वाशी - शिर्की खारेपाटात अवतरण्यासाठी शेकाप पेण विधानसभा मतदार क्षेत्रातील तब्बल ५,००० नागरिक रविवारपासून पायी चालत मुंबई मुख्यमंत्री निवास वर्षावर कूच करणार

Today's struggle for water in Pen | पेणमध्ये पाण्यासाठी आजपासून संघर्ष यात्रा

पेणमध्ये पाण्यासाठी आजपासून संघर्ष यात्रा

googlenewsNext

पेण : हेटवण्याची गंगा वाशी - शिर्की खारेपाटात अवतरण्यासाठी शेकाप पेण विधानसभा मतदार क्षेत्रातील तब्बल ५,००० नागरिक रविवारपासून पायी चालत मुंबई मुख्यमंत्री निवास वर्षावर कूच करणार आहेत. पेणच्या खारेपाटाला भेडसावणारी भीषण पाणीटंचाई निवारणार्थ थेट हेटवणे धरणातून वाशी खारेपाटाला पूरक ठरणारी नळ पाणीपुरवठा योजना व त्यासाठी लागणारी ३६ कोटींच्या निधीच्या तरतुदीसाठी शेकाप आ. धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाणी संघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे.
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत २००९-१० पासून राज्यातील ८९ हजार ४०४ गावे - वस्त्यावाड्यांवर पाणीपुरवठा योजना राबविल्या गेल्या. उर्वरित ११ हजार २३५ गावांपैकी २ हजार ८३५ गावांसाठी केलेल्या आराखड्यात २ हजार ४८४ कोटी खर्चाच्या पाणीपुरवठा योजनांचा कृती आराखडा बनविण्यात आला. यासाठी राज्य सरकारला १ हजार ४५७ कोटी १२ लाख रुपयांची गरज आहे. मात्र केंद्र सरकारने ८०५ कोटींचा निधी देण्यास नकार दिला. अपुऱ्या निधीअभावी राज्यातील हजारो योजना अर्धवट स्थितीत तर १,७०० योजना बंद पडल्या आहेत. (वार्ताहर)


पेण परिसरात हेटवणे, आंबेघर या दोन धरणांचे पाणी धरणातच पडून आहे. या पाण्याचा १५ वर्षांत ना पिण्यासाठी ना सिंचनासाठी पूर्णपणे वापर करण्यात आला. पाणी असूनही पाण्यासाठी जनतेचा टाहो सुरू आहे. हेटवणे धरणात सध्या ८७ मीटर पाणी पातळी आहे. धरणाचे ८० दशलक्ष पाणी सिंचनासाठी आरक्षित आहे. मात्र सिंचन व्यवस्था २० टक्केच कार्यरत आहे. ६,६६८ हेक्टर सिंचनक्षेत्र असताना आजपर्यंत ८०० हेक्टर ओलिताखाली आहे.

Web Title: Today's struggle for water in Pen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.