रुग्णांसाठी टोल फ्री क्रमांकाची सेवा; डॉक्टर आणि रुग्णांच्या नातेवाइकांमधील संघर्षाला पूर्णविराम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 04:32 AM2017-10-31T04:32:38+5:302017-10-31T04:33:07+5:30
सरकारी रुग्णालयातील डॉक्टर आणि रुग्णांचे नातेवाईक यांच्यामध्ये सातत्याने होणा-या संघर्षाला आता पूर्णविराम मिळणार आहे. रु ग्णालयामध्ये डॉक्टर उपलब्ध नसल्यास १०४ या टोल फ्रीक्र मांकावर फोन करायचा आहे.
- आविष्कार देसाई
अलिबाग : सरकारी रुग्णालयातील डॉक्टर आणि रुग्णांचे नातेवाईक यांच्यामध्ये सातत्याने होणाºया संघर्षाला आता पूर्णविराम मिळणार आहे. रु ग्णालयामध्ये डॉक्टर उपलब्ध नसल्यास १०४ या टोल फ्रीक्र मांकावर फोन करायचा आहे. पुढील काही कालावधीमध्ये आरोग्य सेवा उपलब्ध होऊन ड्युटीवर गैरहजर असलेल्या डॉक्टरांना कारवाईचा डोस पाजण्याची तयारी सरकारने पूर्ण केली आहे. १ नोव्हेंबरपासून या सेवेला राज्यभरात सुरुवात होणार आहे.
सरकारच्या या उपायामुळे ड्युटीवरील डॉक्टरांवर चांगलाच वचक बसण्यास मदत मिळणार असल्याचे बोलले जाते. ग्रामीण, तालुका आणि जिल्हास्तरावरील सरकारी
रु ग्णालयांमध्ये सरकारी सेवेत असणारे बहुतांश डॉक्टर हे आपापल्या प्रायव्हेट प्रॅक्टीस करण्यामध्ये मश्गूल असल्याचे दिसून आले आहे. प्रायव्हेट प्रॅक्टीस तर, दुसरीकडे सरकारी पगार असे डॉक्टरांचे दोन्ही हात तुपात असतात. परंतु त्यामुळे तासन्तास रु ग्णांना सरकारी
रु ग्णालयामध्ये डॉक्टरांसाठी ताटकळत बसावे लागते. वेळेवर आरोग्य सुविधा न मिळाल्यामुळे रु ग्णांचे नातेवाईक आणि डॉक्टरांमध्ये संघर्ष होत असल्याचे वेळोवेळी पुढे आले आहे.
शवविच्छेदन तत्काळ करायचे आहे, रुग्णांना उपचारासाठी
रुग्णालयात घेऊन गेला आहात, काहीतरी इमर्जन्सी आहे, महिलांची प्रसूती आहे, बाळ आजारी आहे आणि प्राथमिक, ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरच उपस्थित नाहीत. अशा वेळी
रु ग्णाने किंवा रु ग्णाच्या नातेवाइकाने आता १०४ या टोल फ्री क्र मांकावर कॉल करून आपली तक्र ार नोंदवायची आहे. हा कॉल पुण्यामध्ये उभारलेल्या कंट्रोल रु मशी जोडला जाणार आहे. तेथे २५ कर्मचारी चोवीस तास नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्याजवळ राज्यातील सर्व ग्रामीण आणि प्राथमिक रुग्णालयातील डॉक्टरांचे नाव आणि संपर्क नंबर असणार आहेत.
अवघ्या काही सेकंदांत संबंधित रु ग्णालयामध्ये कोणत्या डॉक्टराची ड्युटी आहे, ते सध्या कोठे आहेत याची माहिती घेतली जाणार आहे. त्यानंतर संबंधित डॉक्टरांना तातडीने
रु ग्णालयात पाठविण्याची व्यवस्था केली जाणार आहे. या सेवेत डॉक्टरांनी कामचुकारपणा केला तर वरिष्ठांना माहिती देऊन संबंधित डॉक्टरांवर तातडीने कारवाई केली जाणार
आहे.
विशेष म्हणजे प्रत्येक आलेला कॉल हा रेकॉर्ड केला जाणार आहे. प्रत्येक घडामोडीची माहिती संबंधित जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सकांनाही दिली जाणार आहे. या सुविधांमुळे राज्यामध्ये आरोग्य सेवा तातडीने उपलब्ध होण्यास मदत मिळणार आहे.
डॉक्टरांनी रु ग्णालयात थांबलेच पाहिजे यासाठी सरकारने आतापर्यंत विविध उपाय करून पाहिले आहेत.
मात्र डॉक्टरांनी त्यामध्ये पळवाटा शोधण्याचे काम केल्याचे वेळोवेळी समोर आले आहे.
दैनंदिन हजेरी असो अथवा बायोमेट्रिक पद्धती या सपशेल फोल ठरल्याने कामचुकार डॉक्टरांचे चांगलेच फावत होते.
आता मात्र या नव्या उपाययोजनेमुळे त्याला चाप बसणार आहे.
1811
महाराष्ट्रात प्राथमिक
रु ग्णालये
387
ग्रामीण
रु ग्णालये आहेत
५० बेडची
५६ उपजिल्हा
रु ग्णालये आहेत
१०० बेडची
२५ उपजिल्हा
रु ग्णालये आहेत
४ सामान्य रु ग्णालये आहेत. ११ महिला रु ग्णालये तर २३ जिल्हा रु ग्णालये आहेत
104येथील डॉक्टरांचा कंट्रोल रूमशी संपर्क असणार