जो जीभ जिंकेल, तो मन जिंकेल; लक्ष्मीखार येथे प्रवचन सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 10:50 PM2020-02-06T22:50:17+5:302020-02-06T22:50:32+5:30
मुरुड : शरीर साक्षात परमेश्वर आहे व ते शरीर आपल्याला भगवंताने नाम घेण्यासाठी दिले आहे, असे सांगितले. जो जीभ ...
मुरुड : शरीर साक्षात परमेश्वर आहे व ते शरीर आपल्याला भगवंताने नाम घेण्यासाठी दिले आहे, असे सांगितले. जो जीभ जिंकेल, तो मन जिंकेल, असे सांगताना अनिष्ट उच्चार, विचार व आचार हे बदलायचे असतील तर जिभेला काम दिले पाहिजे व त्यासाठी विश्वप्रार्थना खूप मदत करते, हे उदाहरणाद्वारे पटवून दिले.
सद्गुरू पै महाराजांनी नामाचे महत्त्व हे तरुणपणातच कळल्यामुळे त्यांनी जगाला नामाचे महत्त्व व महात्म्य पटवून दिले व जग सुखी होण्यासाठी अनेक ग्रंथ लिहिले. तसेच विश्वप्रार्थनेची निर्मिती केली, असे प्रवचनकार वंदना पठाडे यांनी सांगितले. येथील रुक्मिणी दामोदर मिठाग्री व सुनीता जनार्दन मिठाग्री यांनी वयाची ८५ वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्त लक्ष्मीखार ग्रामस्थ मंडळाचे तालुका अध्यक्ष सुनील मिठाग्री यांनी आपल्या आई व काकीची लक्ष्मीखार येथे तुला केली.
तुलेसाठी सुनील मिठाग्री व त्यांच्या भगिनी कल्पना रघुनाथ माळी यांनी सद्गुरू श्री वामनराव पै यांचा ग्रंथ दिला. या वेळी लक्ष्मीखार या ठिकाणी सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या शिष्या वंदना पठाडे यांचे प्रवचन ठेवण्यात आले होते.