पनवेल : नवरंग सर्कल ते गोखले शाळेकडे जाणाऱ्या रोडवर होणारी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी वाहतूक विभागाने सम-विषम पार्किंग सुरू केली आहे. सम-विषम पार्किंग योजनेचा बोजवारा उडाला असून, नियम तोडणाºयांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
खारघर सेक्टर-७ बँक आॅफ इंडिया ते घरकुल आणि नवरंग सर्कल ते गोखले स्कूल, शिल्प चौक या अरुं द रस्त्यावर नियमित वाहतूककोंडी होत असे, तसेच रस्त्याच्या दोन्ही कडेला दुकाने असल्यामुळे ग्राहकांची वर्दळ या परिसरात मोठ्या प्रमाणात असते. त्यात ग्राहक आपली वाहने रस्त्याचा कडेला उभी करून खरेदी करीत असत, अरुंद रस्ता आणि रस्त्यावर होणारी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी वाहतूक विभागाने सम-विषम पार्किंग योजना सुरू केली. यावेळी काही जागरूक नागरिकाने वाहतूक विभागाला सम-विषम तारखेचे फलक मोफत उपलब्ध करून दिले, त्यामुळे वाहनचालक सम-विषम तारखेनुसार वाहने उभी करीत असत दरम्यान, नियम मोडणाºया वाहनचालकांच्या विरोधात पोलिसांकडून कारवाई केली जात असे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावर वाहतूक पोलिसांनी पाठ फिरवल्याचे दिसून येते. रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या सहा महिन्यांत वाहतूक विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे वाहनचालक रस्त्याच्या दुतर्फा वाहने वाहने उभी करीत असल्यामुळे सायंकाळी ६ ते रात्री ९ च्या सुमारास रस्त्यावर वाहतूककोंडी होत आहे. वाहतूक पोलिसांनी सदर वाहनावर कारवाई करण्याऐवजी वाहतूक एकीकडे आणि कारवाई दुसरीकडे, असा प्रकार खारघरमध्ये दिसून येतो. त्यात दसरा, दिवाळी सणांस खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी असते. वाहतूक पोलिसांनी सदर रस्त्यावरील वाहतूककोंडी सोडवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.खारघरमध्ये रस्त्याचा कडेला असलेल्या दुकानासमोर वाहनतळाची सोय असणे आवश्यक आहे. सिडकोकडे पत्रव्यवहार करूनही उपाययोजना केली जात नाही. रस्त्यावर उभ्या केल्या जाणाºया वाहनावर वाहतूक पोलीस कारवाई करीत असतात. मात्र, कारवाई करताना वाहनचालक प्रथम वाहने उभी करण्यासाठी जागेची मागणी करतात.- प्रवीण पांडे, सहायक निरीक्षक.