अव्वल कारकुन लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात; पनवेल तहसील कार्यालयातील घटना 

By वैभव गायकर | Published: March 14, 2024 07:34 PM2024-03-14T19:34:40+5:302024-03-14T19:35:32+5:30

40 पट नजराणा भरण्यासाठी अव्वल कारकून असलेल्या किरण गोरे यांनी 40 हजारांची लाच मागितली होती.

Top officials in department's web of bribery Incident at Panvel Tehsil Office | अव्वल कारकुन लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात; पनवेल तहसील कार्यालयातील घटना 

अव्वल कारकुन लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात; पनवेल तहसील कार्यालयातील घटना 

पनवेल: पनवेल तहसील कार्यालयातील अव्वल कारकून किरण गोरे याला 40 हजारांची लाच घेताना नवी मुंबई लाच लुचपत विभागाने दि. 14 रोजी रंगेहाथ पकडले. कुल कायद्यात प्राप्त झालेल्या जमीन भोगवटा दार दोन ची जमीन एक करण्यासाठी तक्रारदार शेतकऱ्यांनी अर्ज केला होता. 40 पट नजराणा भरण्यासाठी अव्वल कारकून असलेल्या किरण गोरे यांनी 40 हजारांची लाच मागितली होती.

ही लाच रंगेहाथ पकडल्यानंतर गोरे याला लाच लुचपत नवी मुंबई विभागाने अटक केली आहे. या प्रकरणामुळे पनवेल तहसील कार्यालयातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे. एका आठवड्यापूर्वीच ऑनलाईन नोंदी वेळेवर केल्या जात नसल्याने पनवेल मधील मंडळ अधिकाऱ्यावर ठपका ठेवत त्यांची बदली रेकॉर्डरूम मध्ये करण्यात आली होती. ऑनलाईन नोंदी वेळेत केल्या जात नसल्याचा ठपका यावेळी ठेवण्यात आला होता.

Web Title: Top officials in department's web of bribery Incident at Panvel Tehsil Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.