कर्जतमध्ये शिवजयंतीनिमित्त मशाल मिरवणूक
By admin | Published: February 20, 2017 06:23 AM2017-02-20T06:23:38+5:302017-02-20T06:23:38+5:30
तालुक्यात अनेक गावांमध्ये शिवजयंतीनिमित्त मशाल मिरवणुका, शिवचरित्रावरील व्याख्यान आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात
कर्जत : तालुक्यात अनेक गावांमध्ये शिवजयंतीनिमित्त मशाल मिरवणुका, शिवचरित्रावरील व्याख्यान आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
शिवजयंतीनिमित्त शिवराज प्रतिष्ठानच्या विकी गुरव, अक्षय सोनावळे, सूरज हडप, सागर गंगावणे, नीलेश मुने, प्रतीक ठाकरे आदी सदस्यांनी माथेरानजवळील पेप किल्ल्यावरून मशाल आणली. तत्पूर्वी शिवराज प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसराचे सुशोभीकरण केले. संचिता कडू आणि स्वप्नाली पाटील यांनी परिसरात रंगावल्या साकारून सुशोभीकरण केले होते. प्रतिष्ठानच्या महिला विभाग अध्यक्षा पद्मिनी गुरव यांच्यात हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. शंकर ठोंबरे यांच्यात हस्ते शिवरायांचे पूजन केले. शिवरायांची आरती करून त्यांच्या नावाचा जयघोष केला.
कोठिंबे येथील खांबलिंगेश्वरच्या सदस्यांनी राजमाची किल्ल्यावरु न विक्र ांत कर्वे, अनंत गायकवाड, मंगेश पवार, आदित्य गायकवाड, मिलिंद डामसे, संतोष मोरे, नरेश मोरे, जयेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मशाल दौड करून कर्जतच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत आणून मिरवणुकीने कोठिंब्यापर्यंत नेली. (वार्ताहर)
महाडमध्ये विविध कार्यक्रम
महाड : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज महाडमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. नगराध्यक्ष स्रेहल जगताप यांच्या हस्ते छ. शिवरायांच्या शिवाजी चौकातील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावर्षी सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी मच्छींद्र घोलप तसेच महाडकर नागरिक मोठ्या संस्थेने उपस्थित होते. महाड नगरपरिषदेतही यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन के ले होते.
जनता विद्यालयात शिवजयंती साजरी
रसायनी : जनता विद्यालय व ज्यु. कॉलेज मोहोपाडा (ता. खालापूर) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३८७ वी जयंती (शासकीय) लेझीम पथकाच्या रॅलीने साजरी झाली.
च्ग्राम सुधार मंडळाचे सचिव तात्यासाहेब म्हसकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.यावेळी मराठी व इंग्रजी माध्यम विद्यालयाचे प्राचार्य अनुक्र मे डी. सी. सुपेकर, बी. एस. वारे आदी उपस्थित होते.
माथेरानमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी
माथेरान : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची शासकीय शिवजयंती नगर परिषदेच्या माध्यमातून येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी अकरा वाजता नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष कक्षात छत्रपतींच्या प्रतिमेला विद्यमान नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
पांडे रोड येथे छत्रपतींच्या अर्धपुतळ्याला स्थानिक कार्यकर्ते राजू कदम, रवींद्र परब यांच्या हस्ते पुष्पहार, छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील छत्रपतींच्या अर्धपुतळ्याला ज्ञानेश्वर बागडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. हुतात्मा भाई कोतवाल यांच्या अर्धपुतळ्याला माजी नगरसेवक कुलदीप जाधव, हेमंत बिरामणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, विद्यमान नगरसेवक प्रसाद सावंत, संदीप कदम, राकेश चौधरी,चंद्रकांत जाधव, नगरसेविका सोनम दाभेकर, प्रतिभा घावरे, ज्योती सोनावळे, कीर्ती मोरे आदींसह नागरिक उपस्थित होते.