जाळ्यामध्ये अडकलेल्या कासवाला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 01:18 AM2019-07-30T01:18:01+5:302019-07-30T01:18:04+5:30
दिवेआगर समुद्रकिनारी सकाळी ११.३० च्या सुमारास दिवेआगर किनारी जीवरक्षक म्हणून कार्यरत असलेले प्रीतम भुसाणे नेहमीप्रमाणे फेरफटका मारीत होते.
बोर्ली पंचतन : दिवेआगर समुद्रकिनारी पाण्यामध्ये सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास मच्छीमारी जाळ्यामध्ये अडकलेला कासव येत असल्याचे जीवरक्षक म्हणून कार्यरत असलेल्या दिवेआगर येथील प्रीतम भुसाणे यांनी पाहिले. इतर सहकाऱ्यांच्या मदतीने कासवाची जाळ्यातून सुटका करीत पुन्हा सुमुद्राच्या पाण्यामध्ये सोडल्याने त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
दिवेआगर समुद्रकिनारी सकाळी ११.३० च्या सुमारास दिवेआगर किनारी जीवरक्षक म्हणून कार्यरत असलेले प्रीतम भुसाणे नेहमीप्रमाणे फेरफटका मारीत होते. यामध्ये सुमुद्राच्या पाण्यातून मासेमारीचे जाळे व बोहा किनारी येत असल्याचे त्यांनी पाहिले. मात्र, बारकाईने पाहिले असता त्यांना अजून काहीतरी जाळ्यामध्ये प्राणी अडकल्याचे दिसले.
समुद्रकिनारी असलेले संतोष भाटकर व मन्सूर बोदलाजी यांना बोलावून घेतले. समुद्राला भरती असल्याने जीवरक्षक प्रीतम भुसाणे पाण्यामध्ये उतरले व जाळ्यामध्ये अडकलेल्या कासवासहित ते जाळे किनाºयावर आणले व दोन सहकारी यांच्या मदतीने कासवाची सुटका केली व कासवाला जीवदान देत पुन्हा समुद्राच्या पाण्यामध्ये सोडले. या वेळी दिवेआगर सरपंच उदय बापट
उपस्थित होते.
जीवरक्षकांचे कौतुक
च्कासवाला दिलेल्या जीवदानाबद्दल जीवरक्षक प्रीतम भुसाणे व सहकारी ग्रामस्थ संतोष भाटकर व मन्सूर बोदलाजी यांचे कौतुक होत आहे. याआधीही जीवरक्षक प्रीतम भुसाणे यांनी भेकराला समुद्रकिनारीच भटक्या कुत्र्यापासून वाचविले होते.