चौलमध्ये पर्यटन व्यवसायवाढीस वाव

By admin | Published: December 28, 2016 03:54 AM2016-12-28T03:54:57+5:302016-12-28T03:54:57+5:30

चौलमध्ये पर्यटन व्यवसायवाढीसाठी वाव असून, पर्यटन स्थळांवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अंदमानला मँग्रोज गार्डन ज्या पध्दतीचे आहे

Tourism business growth in Chaul | चौलमध्ये पर्यटन व्यवसायवाढीस वाव

चौलमध्ये पर्यटन व्यवसायवाढीस वाव

Next

रेवदंडा : चौलमध्ये पर्यटन व्यवसायवाढीसाठी वाव असून, पर्यटन स्थळांवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अंदमानला मँग्रोज गार्डन ज्या पध्दतीचे आहे त्याच धर्तीवर अलिबागला बनवून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी शासनाकडे दोन कोटी रुपयांची मागणी केली आहे. चौल आग्रावमधील रस्त्याचे लवकरच सिमेंट काँक्रीटीकरण करणार असल्याचे आमदार जयंत पाटील सांगितले.
चौल भोवाळेमधील भोवाळे तळ्याच्या परिसरात जैवविविधता उद्यान बनवण्यात येणार आहे. त्या सुशोभीकरणाचे भूमिपूजन विधान परिषदेचे आमदार जयंत पाटील यांनी केले. उपस्थितांचे स्वागत चौल सरपंच प्रतीक्षा राऊत यांनी केले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड.आस्वाद पाटील, प्रवीण राऊत, ग्रामस्थ व वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन सामाजिक वनीकरणचे उपसंचालक (अलिबाग) विद्याधर जुकर यांनी केले. (वार्ताहर)

Web Title: Tourism business growth in Chaul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.