रेवदंड्यात अरुंद रस्त्यामुळे पर्यटनावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 11:55 PM2019-02-09T23:55:16+5:302019-02-09T23:55:19+5:30

रायगड जिल्हा म्हटले की पर्यटकांना किल्ले, लेण्या, अभयारण्ये, विविध प्राचीन मंदिरे, जलदुर्ग व सर्वात महत्त्वाचे म्हणजे विविध ठिकाणचे समुद्रकिनारे. अलिबाग तालुक्यातील रेवदंडा हे गाव अलिबाग शहरापासून सुमारे १७ कि.मी. अंतरावर वसले आहे.

tourism due to narrow road in Revdanda | रेवदंड्यात अरुंद रस्त्यामुळे पर्यटनावर परिणाम

रेवदंड्यात अरुंद रस्त्यामुळे पर्यटनावर परिणाम

Next

- अभय आपटे

रेवदंडा : रायगड जिल्हा म्हटले की पर्यटकांना किल्ले, लेण्या, अभयारण्ये, विविध प्राचीन मंदिरे, जलदुर्ग व सर्वात महत्त्वाचे म्हणजे विविध ठिकाणचे समुद्रकिनारे. अलिबाग तालुक्यातील रेवदंडा हे गाव अलिबाग शहरापासून सुमारे १७ कि.मी. अंतरावर वसले आहे. गावाला ऐतिहासिक महत्त्व आहेच शिवाय आध्यात्मिक क्षेत्र म्हणून ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यामुळे या ठिकाणी येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. रायगडची किनारपट्टी सुरक्षित असली तरी येथील रस्ते मात्र पर्यटनास मारक ठरत आहेत. अरुंद रस्त्यांमुळे होणाºया वाहतूककोंडीमुळे अनेकदा पर्यटक त्रस्त होत असल्याचे दिसते.
मुंबई-ठाण्यापासून दळणवळणास सोयीचे, शांत आणि परवडणारे असल्याने अनेक जण सेकंडहोम म्हणून या शांत परिसराला पसंती देतात. वीकेण्ड, वन डे पिकनिकसाठी अनेक जण रेवदंडा, अलिबागला पसंती देतात. मात्र, जाण्याऐवजी वन-डे पिकनिक होण्यासारखी ही ठिकाणे असल्याने पर्यटकांची संख्या वाढत आहे. मात्र, अरुंद रस्त्यामुळे परिसरात नेहमीच वाहतूककोंडीची समस्या उद्भवते. अनेक ठिकाणी दोन वाहने एका वेळी जाऊच शकत नाहीत. त्यामुळे पर्यटक रेवदंड्याला येण्याचे टाळत असल्याने पर्यटन व्यवसायावरही परिणाम होत आहे. परिणामी, स्थानिकांच्या रोजगाराच्या संधी निर्माण होताना दिसत नाही.
साधारण १९८५ पर्यंत रेवदंडा हे अलिबाग तालुक्याचे रस्ता वाहतुकीसाठी शेवटचे टोक होते. कुंडलिका खाडीवर पूल झाला आणि अलिबाग, रोहा व मुरु ड-जंजिरा तालुके रस्ता वाहतुकीने जोडले गेले. त्यात रेवदंडा हे मध्यवर्ती ठिकाण बनले. पुढे १९८६ च्या सुमारास साळावमध्ये लोखंड शुद्धीकरणाचा प्रकल्प आला. मुरुडमधील फणसाड अभयारण्य, काशिदचा किनारा पर्यटकांच्या पसंतीस उतरले आणि औद्योगिक वसाहत असलेला रोहा तालुक्यातील वाहनांची वर्दळ रेवदंडा बाजारपेठेतून होऊ लागली, त्यामुळे रेवदंडामध्ये वाहतूककोंडी होऊ लागली. रस्त्यावरील हातगाड्या, फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे रस्ता आणखीनच अरुंद झाला आहे. पर्यटकांच्या वाहनांसाठी व अवजड वाहनांसाठी बाह्यवळण मार्ग असला तरी धोकादायक वळणांमुळे पर्यटक बाजारपेठेतील रस्त्याला पसंती देतात.

काही वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीने किनारी भागात दिशादर्शक फलक लावले. मात्र, याच ठिकाणी दर्शनी भागात मच्छीमार्केट थाटल्याने पर्यटक हा मार्ग टाळू लागले. पारनाका, जुनी देना बँक या ठिकाणी दोन वाहने एका वेळी जाऊ शकत नाहीत, इतका अरुंद रस्ता असल्याने पर्यटक पाठ फिरवत आहेत. पर्यटनाला चालना देण्यासाठी परिसरात रस्ता रुंदीकरण व पार्किंग व्यवस्था होणे गरजेचे असल्याचे मत परिसरातील उपाहारगृह व्यावसायिकाने व्यक्त केले आहे.

रेवदंड्यात लवकरच नवे मच्छीमार्केट उभारण्यात येणार आहे. त्यामुळे किनाºयावर जाणारा रस्ता मोकळा होईल. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विद्युत व्यवस्था, आसनव्यवस्था केली जात आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यांचीही दुरुस्ती करण्यात येणार आहे.
- मनीषा चुनेकर, सरपंच

Web Title: tourism due to narrow road in Revdanda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड