मुरुड : मार्च महिन्याच्या संचारबंदीच्या कालवधीनंतर हॉटेल लॉजिंग रेस्टॉरंट गेले अनेक दिवस बंद होते, परंतु आता संचारबंदीत शिथिलता आणल्यानंतर व शासनाने ई-पास रद्द केल्यामुळे लोकांना सर्वत्र जाण्याची मुभा मिळाली. यामुळे मुरुड येथे आता शनिवार-रविवारी पर्यटक दिसू लागले आहेत. पर्यटक आल्याने समुद्रकिनारी घोडागाडीची स्वारी करणाऱ्यांना आता रोजगार उपलब्ध होऊ लागला आहे. मुरुड येथे पर्यटक वाढणार असून, त्यासाठी ऐतिहासिक जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्यात यावा, अशी मागणी पर्यटक व स्थानिक नागरिकांकडून होत आहे.पर्यटक आता हळूहळू मुरुडला येऊ लागले आहेत. विशेषत: शनिवार-रविवारी पर्यटक समुद्रकिनारी दिसू लागले आहेत. सायंकाळी समुद्र स्नान व घोडेस्वारी यावर पर्यटकांचा अधिक कल दिसून येत आहे. सध्या समुद्रावर शंखही खूप मोठ्या प्रमाणात आले असून, ते पर्यटकांना खूप आकर्षित करीत आहेत. मुरुडमधील लॉजिंगवर काही प्रमाणात गर्दी दिसत आहे. याबाबत लॉजिंग व हॉटेल व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले आहे. सर्व लॉजिंग व्यावसायिक शासनाच्या नियमाप्रमाणे सॅनिटायझर, मास्क व सोशल डिस्टन्स अशा गोष्टींचे काटेकोर पालन करत आहेत.याबाबत मुरुड शहरातील बांबू हाउस लॉजिंगचे मालक प्रयाग केंडू यांनी, मुरुडला पर्यटक येऊ लागले आहेत, मागील आठवड्यात ५० पेक्षा जास्त पर्यटक आले होते, ही खूप चांगली गोष्ट असून, पर्यटन फुलण्यास मदत होणार आहे. आलेल्या पर्यटकांना रूम सॅनिटायझ करून देत असून, शासनाचे सर्व नियम पाळण्यावर अधिक भर आहे, असे सांगितले.शिडांच्या बोटी सुरू कराशासनाने आता ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी शिडांच्या बोटीही सुरूकरण्यात याव्यात. सध्या पर्यटक येण्याचे प्रमाण खूप अल्प असले, तरी जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला केल्यास मोठ्या प्रमाणात पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे, अशी मागणी स्थानिकांकडूनहोत आहे.
मुरुड तालुक्यात पर्यटनाला झाली सुरुवात, सुट्टीच्या दिवशी येत आहेत पर्यटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 11:41 PM