माथेरान : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी माथेरान फुलून गेले आहे. अन्य पर्यटनस्थळाच्या तुलनेत माथेरानला अत्यंत वाजवी दरात राहण्याची सोय होत असते. फक्त शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांमध्ये लॉज, हॉटेल्सच्या दरांत थोडाफार फरक जाणवतो. मुंबई आणि पुण्यापासून हे अगदीच जवळचे ठिकाण असल्याने येथे पर्यटकांची मांदियाळी नेहमीच पाहावयास मिळते. त्यातच मागील सहा माहिन्यांपासून बंद असलेली मिनिट्रेन सेवा पूर्वपदावर आल्याने सर्वच पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.अमन लॉज ते माथेरानपर्यंतच्या मिनिट्रेन शटल सेवेचा मनमुराद आनंद घेण्यासाठी पर्यटक गर्दी करताना दिसत असून शटल सेवेच्या माध्यमातून रेल्वेच्या उत्पन्नात चांगल्या प्रकारे भर पडत आहे. ज्येष्ठ पर्यटक हातरीक्षामधून तर नवदाम्पत्य, प्रेमी युगुले आणि हौशी पर्यटक घोड्यावरून रपेट मारत आहेत. नगर परिषद गटनेते प्रसाद सावंत आणि मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी पर्यटकांच्या सोयीसाठी दस्तुरी नाक्यावर एटीएम मशीनची सोय केल्यामुळे कुणाही पर्यटकाला पैशाची चणचण भासत नाही. त्यामुळे सायंकाळी बाजारात खरेदीसाठी पर्यटक गर्दी करीत असून सर्वांना चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळत आहे. शटल सेवेमुळे येथे पर्यटन व्यवसाय वृद्धिंगत होताना दिसून येत आहे.नगर परिषद प्रशासन सज्जदस्तुरी नाक्यावर पर्यटकांची दिशाभूल होऊ नये यासाठी नगर परिषदेच्या माध्यमातून घोडा, हातरीक्षा, ओझेवाले यांचे दरफलक असलेले माथेरान पॉइंट्स तसेच शटल सेवेचे वेळापत्रक असलेले नकाशे मोफत देण्यात येत आहेत; त्यामुळे कुणाही नवख्या पर्यटकांची यापुढे दिशाभूल होणार नाही.माथेरानची प्रतिमा मलिन होणार नाही यासाठी नगर परिषदेने कंबर कसली आहे. गर्दीच्या वेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सहायक पोलीस निरीक्षक पी. काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्तदेखील करण्यात आला आहे.सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी अनेकदा गर्दीमुळे राहण्यास जागा उपलब्ध होत नाही; त्यासाठी बहुतांश पर्यटकांनी आपापल्या आवडत्या लॉज, हॉटेलचे आॅनलाइन आरक्षण केलेले आहे.नगर परिषद स्वच्छतेबाबत नेहमीच अग्रेसर राहिली असून पर्यटकांनीसुद्धा आपल्याजवळ असणाऱ्या प्लास्टीकच्या बाटल्या तसेच अन्य कचरा जवळच्या कचराकुंडीत जमा करून नगर परिषदेला सहकार्य करावे.- रामदास कोकरे, मुख्याधिकारी, नगर परिषदनगर परिषद माध्यमातून आम्ही पर्यटकांना सेवा उपलब्ध देण्यासाठी कटिबद्ध आहोत. दस्तुरी पार्किं ग येथे गाड्यांची पार्किं ग व्यवस्था चोख करण्यात आली आहे. विविध पॉइंट्सवर सुरक्षेसाठी रेलिंग बांधण्यात आलेले आहेत. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अनेक हॉटेल्समध्ये रंगीबेरंगी विद्युत रोशणाई केलेली आहे. त्यामुळे हा सुट्ट्यांचा हंगाम सर्वांना आर्थिकदृष्ट्या फलदायी ठरेल.- प्रसाद सावंत, गटनेते, माथेरान नगर परिषदखरोखरच माथेरानची शटल सेवा सुरू झाल्यामुळे आमचा आनंद गगनात मावत नाही. येथे राहण्याची सोय उत्तम प्रकारे वाजवी दरात झाल्याने समाधान आहे. शांत आणि स्वच्छ वातावरणात फिरण्याची मजा ही काही औरच आहे. सर्वांनीच न चुकता आवर्जून या स्थळाला एकदातरी जरूर भेट द्यायलाच हवी.- सुरेखा पटवर्धन, पर्यटक - मुंबईमाथेरानकरांचा उदरनिर्वाह पूर्णत: पर्यटनावर अवलंबून आहे. महत्त्वाचा दिवाळी हंगाम पूर्ण फ्लॉप गेल्याने व्यावसायिक मोठ्या आर्थिक संकटात सापडले असताना नाताळच्या सिझनने मोठा दिलासा दिला आहे.- सुनील शिंदे, सामाजिक कार्यकर्ते
माथेरानमध्ये पर्यटकांची मांदियाळी; उत्साही वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 1:08 AM