शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

पर्यटकांना आठवडा बाजारचे आकर्षण

By admin | Published: January 09, 2016 11:47 PM

निसर्गरम्य वातावरण, नारळी पोकळीच्या बागा, दूरवर पसरलेला समुद्रकिनाऱ्याबरोबरच रायगड जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना येथील आठवडा बाजारची भुरळ पडत आहे.

- जयंत धुळप, अलिबागनिसर्गरम्य वातावरण, नारळी पोकळीच्या बागा, दूरवर पसरलेला समुद्रकिनाऱ्याबरोबरच रायगड जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना येथील आठवडा बाजारची भुरळ पडत आहे. १३३ वर्षांची प्राचीन आठवडा बाजार सध्या पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत. १८८३ मध्ये अलिबाग तालुक्यात अलिबाग, रेवदंडा, किहीम, पोयनाड, रामराज, आंबेपूर, आणि नागाव, पेण तालुक्यात पेण व नागोठणे, माणगाव तालुक्यात माणगाव व निजामपूर, रोहा तालुक्यात रोहा व अष्टमी आणि महाड तालुक्यात महाडला आठवडा बाजार भरण्यास प्रारंभ झाला. ग्रामीण भागात गरजेपोटी सुरू झालेले हा बाजार तालुक्यांतील विक्रेत्यांकरिता महत्त्वाची बाजारपेठ ठरला आहे. अलिबाग तालुक्यातील पोयनाड ही एक मोठी दैनिक बाजारपेठ आजही सुप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर येथे दर सोमवारी मोठा आठवडा बाजारही भरतो. सरकारी दप्तर नोंदीनुसार प्रारंभीच्या काळात पोयनाड बाजारात २०० विक्रेते आणि १ हजार १०० खरेदीदार येत असत तर हटाळे-नागावच्या आठवडे बाजारात प्रांरभीच्या काळात १५ विक्रेते व १०० खरेदीदार येत असत.१८८१ च्या सुमारास तत्कालीन मुरुड-जंजिरा संस्थानातील म्हसळा व श्रीवर्धनला आठवडे बाजार भरत असे. १८८२ मध्ये तत्कालीन ठाणे जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात गौळवाडी, कोंदिवडे, दहिवली, कडाव, नेरळ, कदंब, सुगवे, खालापूर व तुपगाव या नऊ ठिकाणी मोठा आठवडे बाजार भरत असत. काळाच्या ओघात जिल्ह्यातील काही बाजार बंद झाले तर काही ठिकाणी नव्याने आठवडे बाजार सुरू झाले. त्यामध्ये अलिबागजवळच्या वरसोली आणि सहाण या दोन आठवडे बाजारांचा समावेश आहे.आठवडा बाजारातील खरेदीची मौजजिल्ह्यात भरणाऱ्या आठवडे बाजारांपैकी अनेक बाजार हे पर्यटनस्थळाच्या ठिकाणी आहेत. तर अनेक बाजार सागरी किनाऱ्यांकडे जाणाऱ्या मार्गावर असल्याने येथे पर्यटक आवर्जून थांबतात. मॉलच्या तुलनेत आठवडे बाजारात घासाघीस करून माल खरेदी करण्याची मजा काही औरच असल्याचे पिंपरी चिंचवड येथून आलेले आणि हाटाळे-नागांवच्या आठवडे बाजारात खरेदी करणारे दत्ता सरपोतदार यांनी सांगीतले.थेट शेतकऱ्यांकडून विकत घेतल्याचा आनंद मॉलमध्ये जे मिळत नाही ते या आठवडे बाजारात मिळते. मातीशी नेमके नाते सांगणारा हा बाजार गावाच्या वातावरणाचा आनंद देतो, अशी प्रतिक्रिया अंधेरीच्या प्रतिभा देव यांनी दिली. शेतकऱ्याच्या हातून तांदूळ, नारळ, वाल, चणे आदी थेट विकत घेताना आनंद आणि समाधान मिळते. शिवाय दलालांऐवजी मेहनत करणाऱ्या शेतकऱ्यांना जास्त मोबदला मिळत असल्याने दोन पैसे जास्त देण्याची तयारीही यावेळी असल्याचे अंधेरीच्याच विद्या जावकर यांनी सांगितले.