शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

श्रीवर्धनमधील पेशवेकालीन पर्यटन स्थळे दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 4:35 AM

 श्रीवर्धन शहरातील नगरपरिषदेच्या पर्यटनपूरक भूमिकेमुळे पर्यटनात आमूलाग्र वाढ झालेली आहे. मात्र शहरातील पेशवेकालीन पर्यटन स्थळे दुर्लक्षित असलेले निदर्शनास येत आहे.

श्रीवर्धन -  श्रीवर्धन शहरातील नगरपरिषदेच्या पर्यटनपूरक भूमिकेमुळे पर्यटनात आमूलाग्र वाढ झालेली आहे. मात्र शहरातील पेशवेकालीन पर्यटन स्थळे दुर्लक्षित असलेले निदर्शनास येत आहे. त्यामुळे प्राचीन व ऐतिहासिक ठेव्यापासून पर्यटक वंचित राहत आहेत असे निदर्शनास येते.श्रीवर्धन शहर हे श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचे जन्म गाव आहे. महाराष्ट्रातील विविध भागातून पर्यटक श्रीवर्धन भेटीसाठी नियमित येतात. श्रीवर्धन नगरपरिषदेने पर्यटक निधीच्या स्वरूपात २ लाख ३४ हजार २८५ रुपये कमाई केली आहे.पेशव्यांच्या काळात श्रीवर्धन तालुक्यात विविध मंदिराचे सुबक व आकर्षक बांधकाम करण्यात आले.श्रीवर्धन शहराच्या पश्चिमेस असलेले जीवनेश्वराचे मंदिर त्याचे प्रतीक आहे. ते शहराच्या पश्चिम दिशेला १ किमी अंतरावर वसलेले आहे. पेशव्यांनी मंदिराची उभारणी केली. मंदिर प्राचीन असून जुन्या वास्तुकलेचा अप्रतिम नमुना आहे. मंदिराच्या बांधणीत सागवान लाकडाचा सर्वत्र वापर केला आहे.परंतु आज जीवनेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची गरज आहे.जीवनेश्वर मंदिराच्या आतील भिंती काही प्रमाणात खचलेल्या आहेत.पावसाच्या पाण्याचा ओलावा लागत असल्याचे निदर्शनास येत आहे.मंदिर परिसराला संरक्षक भिंतीची नितांत आवश्यकता आहे.पर्यटक व भाविक यांच्यासाठी मुबलक शुद्ध पेयजलाची व्यवस्था करणे गरजेचे आहे. आजमितीस पेयजलासाठी एकमेव पाण्याची टाकी ठेवण्यात आली आहे.मंदिर परिसरात आलेल्या जुन्या बारावात अस्वच्छ पाणी साचले आहे.मंदिर परिसर मोठा असून चांगल्या पद्धतीने रोपवाटिकेचे नियोजन केल्यास मंदिर परिसर आकर्षक बनेल,तसेच पर्यटकांच्या पायाभूत सुविधांचा अभाव आहे. त्या दृष्टीने श्रीवर्धन नगरपरिषदेने काम करणे गरजेचे आहे. मंदिराच्या लगतच नगरपरिषदेने लाखो रुपये खर्च करून पर्यटन वास्तूची निर्मिती केली आहे. मात्र तिथे पर्यटक क्वचितच फिरकतात. श्रीवर्धन नगरपरिषद अद्याप पर्यटन निवासाचा प्रश्न मार्गी लावण्यात यशस्वी झालेली नाही.जीवनेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासंबंधी कुठलीही मागणी प्राप्त झालेली नाही. मागणी झाल्यास त्याविषयी ठराव घेऊन निश्चितच सकारात्मक भूमिका घेतली जाईल.पर्यटन वाढीसाठी नगरपरिषद सदैव तत्पर आहे.- अर्चना दिवे, मुख्याधिकारी,नगरपरिषद श्रीवर्धनजीवनेश्वराचे मंदिर पांडवकालीन आहे. श्रीवर्धनमध्ये येणाऱ्या पर्यटकांना सदर मंदिराविषयी योग्य माहिती उपलब्ध करून दिल्यास निश्चित पर्यटन विकासासाठी फायदा होईल. मंदिराची देखभाल विश्वस्त करतात. नगरपरिषदेकडे मदतीची मागणी झाल्यास निश्चितच त्या अनुषंगाने प्रयत्न करू.- वसंत यादव,पर्यटन सभापती, श्रीवर्धन नगरपरिषदजीवनेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराची गरज आहे. मंदिराच्या आतील भिंती काही प्रमाणात खचत चालल्या आहेत. नगरपरिषदेने अद्याप कोणतीच मदत केलेले नाही. मंदिराला संरक्षण भिंतीची गरज आहे. श्रावण महिन्यात भाविकांची गर्दी असते.- जनार्दन पांडुरंग गुरव,विश्वस्त, जीवनेश्वर मंदिरपर्यटनाच्या दृष्टीने जीवनेश्वर महत्त्वाचे आहे. त्याच्या जीर्णोद्धारासाठी आमदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून प्रयत्न करू. श्रीवर्धन नगरपरिषद पर्यटकांसाठी सदैव सकारात्मक काम करत आहे त्यामुळे आज पर्यटकांच्या संख्येत आमूलाग्र वाढ झाली आहे.- नरेंद्र भुसाने,नगराध्यक्ष, श्रीवर्धन नगरपरिषदश्रीवर्धनमध्ये आजमितीस पर्यटन व्यवसायाला चालना मिळाली आहे. त्या दृष्टीने ऐतिहासिक पर्यटन स्थळे महत्त्वाची आहेत. जीवनेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी योग्य ती मदत केली जाईल. जनतेच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले जाईल.- अवधूत तटकरे,विधानसभा आमदार, श्रीवर्धन

टॅग्स :Raigadरायगडnewsबातम्या