बोर्ली मांडला : सलग सुट्ट्या आल्याने समुद्रकिनारी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. तालुक्यातील सर्व समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले आहेत. त्यामुळे स्थानिक व्यावसायिक, हॉटेल्स, खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. पर्यटकांकडून कोकणी खाद्यपदार्थांना पसंती दर्शवण्यात येत आहे.मुरुड तालुक्यातील अलिबाग, वरसोली, किहीम, नागाव, काशिद, बारशिव, बोर्ली, नांदगाव, मुरु ड आदी ठिकाणच्या समुद्रकिनारी असलेल्या हॉटेल्समध्ये आरक्षण फुल्ल झाले आहेत. नारळी, पोफळीच्या बागांनी बहरलेले, विस्तीर्ण व निळसर सागर किनाºयांवर पर्यटक मनसोक्त आनंद लुटत आहेत. समुद्रकिनारी होणारी गर्दी पाहता हॉटेल व घरगुती जेवण बनविणाºयांचा व्यवसायही तेजीत आहे. अनेक ठिकाणी आॅनलाइन बुकिंग सुविधा उपलब्ध असल्याने मुंबई, पुण्यासहित राज्यभरातून पर्यटक कोकणात दाखल होत आहेत.
सलग आलेल्या सुट्टीमुळे मुरुडचे समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 2:16 AM