नांदगाव/ मुरूड : जिल्हा परिषद रेस्ट हाऊसच्या व हॉटेल गोल्डन स्वानच्या पाठीमागील बाजूस समुद्रालगत सुरूच्या झाडांची दाट वस्ती असून, सध्या या झाडांवर बहुसंख्य वटवाघळांनी मोठी वस्ती के लीआहे. सुरु वातीला या वटवाघुळांची संख्या ही मोजता येण्यासारखी होती; परंतु आजच्या घडीला ही संख्या मोठ्या प्रमाणावर वाढून मोजता न येण्यासारखी हजारोंच्या संख्येने वाढली आहे. अगदी दाटीवाटी करून उंच अशा सुरूच्या झाडांवर गर्दी करून राहत असलेली वटवाघुळे मात्र पर्यटकांचे खास आकर्षण ठरले आहे.मुरूड हे पर्यटकांचे आवडते ठिकाण असल्याने शनिवार, रविवार आणि सुटीच्या दिवशी येथे पर्यटकांची खूप मोठी गर्दी असते. सायंकाळच्या वेळी ही वटवाघुळे अन्न शोधण्यासाठी समुद्राच्या मार्गे अगदी गटागटाने निघतात. हे दृश्य मोबाइलमध्ये घेण्याचा प्रयत्न पर्यटक करताना हमखास दिसतात. समुद्रकिनाऱ्यावर सर्वच सुरूची झाडे या वटवाघुळांच्या वस्तीने व्याप्त झाली आहेत.
वटवाघुळांचे पर्यटकांना आकर्षण
By admin | Published: February 15, 2017 4:49 AM