अपघातात सहलीतील विद्यार्थी बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 11:18 PM2019-01-12T23:18:32+5:302019-01-12T23:18:46+5:30

बस-कारची धडक : दोन महिला जखमी

Tourists escaped in the crash | अपघातात सहलीतील विद्यार्थी बचावले

अपघातात सहलीतील विद्यार्थी बचावले

Next

मुरु ड जंजिरा : मुरुड तालुक्यातील काशीद येथून अलिबाग येथे जाणाऱ्या धोकादायक वळणावर शालेय शैक्षणिक सहलीची बस आणि झायलो कारची जोरदार धडक झाली. अपघातात दोन महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत.


ठाणे जिल्ह्यातील मालेड, ता. मुरबाड येथील जिल्हा परिषद शाळेची शैक्षणिक सहल ही मुरुड येथे आली होती. मुरबाड आगारची बस (एम एच १४ बी टी १३९३) काशीद बीच येथे आली होती. तेथून मुरबाडला जाण्यासाठी निघाली असता, काशीद ग्रामपंचायत हद्दीतील वळणावर बारशिव येथून मुरुडकडे जाणाºया कार (एम एच ४६ झेड ५०२७)ने बसला धडक दिली. या वेळी बसमध्ये ५४ विद्यार्थी आणि चार शिक्षक होते.

सुदैवाने अपघातातून विद्यार्थी बचावले आहेत. मात्र, कारमधील कविता राजदा (३८), लिफिया मेंझेस (३५) या जखमी झाल्या आहेत. कारचालक संजीवकुमार मेळाराम डोंगरा (४५) यांनी अवघड रस्त्याचा अंदान न घेता बेदरकारपणे कार चालविल्या प्रकरणी त्याच्याविरोधात मुरु ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Tourists escaped in the crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात