शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

 समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची ‘भरती’, हॉटेल्स, कॉटेजेस फुल्ल, नऊ दिवसांत ८,८०० पर्यटकांची भेट

By निखिल म्हात्रे | Published: November 19, 2023 6:02 PM

दिवाळीनिमित्त २७ नोव्हेंबरपर्यंत शाळांना सुटी आहे.

अलिबाग : दिवाळीच्या सुटीनिमित्त रायगड जिल्हा पर्यटकांच्या गर्दीने फुलला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मात्र मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले आहेत. येथील हॉटेल्स, कॉटेजेस फुल्ल झाले आहेत. समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी वाढली आहे. ११ नोव्हेंबरपासून ते १९ नोव्हेंबरपर्यंत दरदिवशी ५०० पर्यटक कारने आणि ३३० पर्यटक बोटीने दाखल झाल्याचे वाहतूक पोलिसांकडील नोंदीतून समोर आले. नऊ दिवसांत एकूण ८ हजार ८०० पर्यटकांनी रायगड जिल्ह्याचे दर्शन केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दिवाळीनिमित्त २७ नोव्हेंबरपर्यंत शाळांना सुटी आहे. या सुटीचा आनंद लुटण्यासाठी काही पर्यटक आपल्या कुटुंबीयांसमवेत, तर काही मित्रमंडळींसमवेत रायगड जिल्ह्यात येऊ लागली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील समुद्रकिनारे, गड - किल्ले आदी पर्यटनस्थळे गर्दीने फुलली आहेत. सुटी घालविण्यासाठी पर्यटकांनी रायगड जिल्ह्याला पर्यटनासाठी पसंती दर्शविली आहे.

अलिबागसह नागाव, आक्षी, वरसोली, किहीम, मांडवा, आवास, काशीद, मुरुड, श्रीवर्धन, दिघी असे अनेक समुद्रकिनारे गर्दीने ओसंडून वाहत आहेत. अनेक जण समुद्राच्या लाटांच्या सान्निध्यात राहून पर्यटनाचा आनंद लुटताना दिसत आहेत. काहींनी घोडागाडी, एटीव्ही बाइक्सवर स्वार होऊन समुद्रकिनाऱ्यांचा आनंद लुटला. काहींनी सागरी क्रीडांचा आनंद घेत सुटी उत्साहात घालविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संपूर्ण किनारे पर्यटकांनी गजबजून गेले. समुद्रकिनारी असलेल्या स्टॉल्समधून वडापाव, भजी, पॅटीस अशा वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थांवर पर्यटक ताव मारत आहेत.

माशांवर पर्यटकांचा तावअलिबागसह जिल्ह्यातील अनेक हॉटेल्स, कॉटेजेस पर्यटकांनी फुल्ल झाले होते. बुधवारपर्यंत या ठिकाणी प्रचंड गर्दी असल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. जिल्ह्यात फिरण्यास आल्यावर ताजी मासळी खाण्यावर पर्यटकांकडून अधिक भर दिला जात आहे. पापलेट, सुरमई, बांगडा आदी विविध प्रकारच्या ताज्या मासळीवर पर्यटक ताव मारत असल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. धावपळीच्या जीवनात पर्यटन ही एक आमच्यासाठी पर्वणी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही कुटुंंबीय दिवाळीच्या सुटीत अलिबागमध्ये फिरण्यास येतो. यंदाही आम्ही अलिबागमध्ये सुटीत फिरायला आलो आहोत. समुद्रकिनाऱ्यांच्या सान्निध्यात सुटीचा आनंद घेताना सर्व ताण कमी होण्यास मदत होत असून, एक वेगळा उत्साह यातून मिळतो. - अमर पवार, पर्यटक दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पर्यटक रायगड जिल्ह्यात येऊ लागले आहेत. पुढील रविवारपर्यंत कॉटेजची बुकिंग फुल्ल झाली आहे. पर्यटकांच्या या वाढत्या प्रतिसादामुळे हा व्यवसाय चांगला चालत आहे. - राजेंद्र बानकर, कॉटेज व्यावसायिक

टॅग्स :Raigadरायगडalibaugअलिबाग