आंबोली धरणावर पर्यटकांची तुफान गर्दी
By admin | Published: July 25, 2016 03:04 AM2016-07-25T03:04:33+5:302016-07-25T03:04:33+5:30
मुरु ड शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर आंबोली धरण असून, या धरणावर वर्षा सहलीसाठी पर्यटकांची तुफान गर्दी पाहावयास मिळत आहे.
नांदगाव/ आगरदांडा : मुरु ड शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर आंबोली धरण असून, या धरणावर वर्षा सहलीसाठी पर्यटकांची तुफान गर्दी पाहावयास मिळत आहे. सुमारे २९ कोटी रु पये खर्च करून पिण्याच्या पाण्याकरिता व सिंचन उपयोगासाठी हे धरण बांधण्यात आले. सुमारे पाच किलोमीटर क्षेत्रात धरणाच्या पाण्याची व्याप्ती आहे. या धरणाचे ओव्हरप्लो पाणी चौकोनी हौदात पडून मग ते पाणी वाहून जाते. याच ठिकाणी पर्यटक मनसोक्त भिजण्याचा आनंद लुटत आहेत.
यंदा मुरु ड तालुक्यात २४०० मिलीमीटर एवढा पाऊस पडल्याने नद्या, नाले व असणारी धरणे ओसंडून वाहत आहेत. ओव्हरफ्लो पाण्याचा पर्यटक मनमुराद आनंद घेत असून महिला, पुरु ष व बच्चेकंपनी यात सहभागी झालेले दिसून येते. परिसर खूप मोठा असल्याने पर्यटक स्वत:सोबत भोजन बनवण्याचे साहित्य आणून जेवण सुद्धा या भागात बनवत असल्याचे पाहावयास मिळत आहे, तर काही पर्यटक पार्सल भोजन आणताना दिसत होते. धरण्याच्या या पाण्यात खूप मौजमजा करीत असून, आता हळूहळू या भागात छोटी छोटी दुकाने थाटलेली पाहावयास मिळत आहेत. भाजलेले कणीस तसेच तत्सम पदार्थ सुद्धा मिळत आहेत. मुंबई, नाशिक, कल्याण, बोरीवली, ठाणे व स्थनिक नागरिकांची गर्दी पाहावयास मिळत आहे.
हे धरण खार-आंबोली ग्रामपंचायतअंतर्गत येत असून, ग्रामपंचायत सरपंच मनोज क्र माने म्हणाले की, हे धरण जलसंपदा विभागाच्या ताब्यात असून पर्यटकांना ते कोणतीही सुरक्षितता पुरवीत नाही. या धरणाचा परिसर ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिला, तर आम्ही सुरक्षारक्षक तसेच धरण परिसरातील स्वछता, चेंजिंग रूम सेवा तातडीने पुरवू. वाहनतळासाठी जागा देऊन पर्यटकांना सुविधा देऊ, असे सांगून तशी मागणी सुद्धा जलसंपदा विभागाकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या या धरणावर प्रचंड गर्दी पाहावयास मिळत असून, शनिवार व रविवार या दोन दिवसांत हजारो पर्यटक पाहावयास मिळत आहेत. (वार्ताहर)