- वैभव गायकरपनवेल : मुंबई-गोवा महामार्गावर पनवेलपासून अवघ्या १२ किलोमीटरवर कर्नाळा अभयारण्य आहे. कर्नाळा किल्ला आणि आसपासचा परिसर पक्षी वैविध्याने संपन्न असल्याने महाराष्ट्र शासनाने हा परिसर राखीव वनक्षेत्र घोषित करून पक्षी अभयारण्याचा दर्जा दिला आहे. त्यामुळे दरवर्षी हजारो पर्यटक या ठिकाणाला भेट देतात. वर्षभरात जवळपास ८८ हजार पर्यटकांनी कर्नाळा अभयारण्याला भेट दिली असून, यात विदेशी पर्यटकांसह पक्षितज्ज्ञांची संख्या मोठी आहे. कर्नाळा अभयारण्यात ६४२ वृक्ष प्रजाती, वेली, वनौषधी आणि दुर्मीळ वनस्पती अस्तित्वात आहेत. पक्षी निरीक्षणाशिवाय अभयारण्यातील मुख्य आकर्षण कर्नाळा किल्ला आहे. पर्यटकांसाठी या ठिकाणी निवासाची व्यवस्था आहे.स्थानिक, स्थलांतरित पक्ष्यांचे माहेरघर१२.१५५ चौरस किलोमीटरच्या परिसरात विविध प्रजातींच्या पक्ष्यांचा अधिवास आहे. कर्नाळा अभयारण्य म्हणजे स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांचे माहेरघर मानले जाते. या ठिकाणी विविध प्रजातीचे १४७ पक्षी आढळत असून, त्यातील ३७ प्रजातीचे पक्षी स्थलांतरित किंवा प्रवासी पक्षी आहेत. मध्य आशिया, युरोप, उझबेकिस्तान, सैबेरियातून या ठिकाणी मोठ्या संख्येने पक्षी येत असल्याने पक्षी अभ्यासक सांगतात.जंगली प्राण्यांचाही वावरदेशी-विदेशी प्राण्यांसह बिबटे, बेकर, रानडुक्कर, साळिंदर, रानमांजर आदी दुर्मीळ प्राणी आढळतात.पावसाळ्यात विशेष आकर्षणपावसाळ्यात ट्रेकर्स किल्ला तसेच अभयारण्य परिसरास मोठ्या संख्येने भेट देतात. राखीव वनक्षेत्र घोषित असल्याने प्लॅस्टिक बॉटल्स, पिशव्या नेण्यास प्रतिबंध असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी दिली.
कर्नाळा अभयारण्यात पर्यटकांचा ओघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:33 AM