रायगडमध्ये पर्यटकांनी बहरले समुद्रकिनारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 01:06 AM2019-12-30T01:06:18+5:302019-12-30T01:06:24+5:30

‘मजा करा पण नियमांचे पालन करा’; दिघी सागरी पोलीस, दिवेआगर ग्रामपंचायत सज्ज; लॉजिंग, हॉटेल हाऊसफुल्ल

Tourists visit the beaches in Raigad | रायगडमध्ये पर्यटकांनी बहरले समुद्रकिनारे

रायगडमध्ये पर्यटकांनी बहरले समुद्रकिनारे

googlenewsNext

बोर्ली पंचतन : श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर, हरिहरेश्वर, श्रीवर्धन समुद्रकिनारी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षाच्या स्वागताला गोवा समुद्र किनाऱ्यापेक्षा आता रायगडच्या किनाºयाला मौजमजा करण्यासाठी पर्यटकांनी पसंती दिल्याचे दिसून येत आहे. २७ डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत दिवेआगर येथील लॉजिंग, रिसोर्ट हाऊसफुल्ल असल्याचे चित्र आहे; तर दिवेआगर हे सर्वसामान्य वर्गातील येणाºया पर्यटकांना परवडेल अशा दरामध्ये व रुचकर जेवणासाठी प्रसिद्ध असल्याने या वेळी पर्यटकांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या वतीने समुद्रकिनारी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अतिरिक्त पोलीस बंदोबस्तदेखील मागविण्यात आला आहे. रात्रभर मजा करा; पण नियमांचे पालन करा, असा इशाराही सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार यांनी दिला आहे. दिवेआगर ग्रामपंचायतीनेदेखील पर्यटकांना आनंद लुटता यावा यासाठी समुद्रकिनारी स्वच्छतेबरोबरच, लाईट्सची व्यवस्था के ली आहे.

३१ डिसेंबर म्हटले की, समुद्रकिनारी जाऊन मौजमजा करीत नवीन वर्षाचे स्वागत करण्याचा बेत आज तरुणाईसह कुटुंबेदेखील करतात. सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी शहरी भागातील नागरिकांनी श्रीवर्धनमध्ये जाण्याचा बेत आखला आहे.
पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, कोल्हापूर आदी भागांतून हजारो पर्यटक व सहली येत आहेत. दिघी येथून जंजिरा किल्ला त्याचप्रमाणे हरिहरेश्वराचे दर्शन, सुवर्ण गणेश दर्शन व श्रीवर्धन व दिवेआगर किनारी मनसोक्त मजा करण्यासाठी दिवेआगर पर्यटकांनी हाऊसफुल झाले आहे.

अचानक बेत आखलेल्या काही पर्यटकांना दिवेआगर येथे राहण्यासाठी खोल्या उपलब्ध न झाल्याने बोर्ली, वेळास, शिस्ते येथे आसरा घ्यावा लागत आहे. २०१९ च्या अखेरचा शनिवार-रविवार व ३१ डिसेंबरच्या स्वागतासाठी दिवेआगरमध्ये लॉजिंग हाउसफुल्ल झाल्याचे चित्र आहे.

जिल्हा अधीक्षक कार्यालयाकडून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देण्यात आला असून समुद्रकिनारी तसेच दिवेआगरच्या आसपासच्या महत्त्वाच्या गावांत पोलीस तैनात राहणार आहेत. मद्य प्राशन करून गाडी चालविणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. रात्रभर मजा करताना कोणत्याही प्रकारे नियमांचा भंग होणार नाही व कोणासही त्रास होणार नाही याची दक्षता बाळगावी.
- महेंद्र शेलार, पोलीस निरीक्षक, दिघी सागरी पोलीस ठाणे

Web Title: Tourists visit the beaches in Raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.