पर्यटकों, याद रखना समुंदर बुलाता है, लेकिन हमको जानेका नहीं!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 10:55 AM2023-11-22T10:55:14+5:302023-11-22T10:55:42+5:30

मुरुड समुद्रकिनारी ११७ जणांचा पोहताना बुडून मृत्यू

Tourists, yaad rakhana samundar bulata hai, lakin hamko janeka nahin! | पर्यटकों, याद रखना समुंदर बुलाता है, लेकिन हमको जानेका नहीं!

पर्यटकों, याद रखना समुंदर बुलाता है, लेकिन हमको जानेका नहीं!

गणेश चोडणेकर

आगरदांडा  : मुरुड तालुका पर्यटनासाठी नावारूपाला येत असून येथे वर्षाला लाखो पर्यटक देश-विदेशातून येत आहेत. मात्र, बेफिकीर  पर्यटकांसाठी येथील समुद्र किनारे धोकादायक ठरत आहेत. काशिद समुद्राची नैसर्गिक रचना इतर समुद्राकिनाऱ्यांपासून थोडीफार वेगळी आहे. 

पहिली वाळू, नंतर खोलगट भाग, समुद्राचा पाणी व पुन्हा खोलगट भाग असून त्यात खडकाळ भागही आहे. त्यामुळे पर्यटकांना पोहताना अंदाज येत नाही. आतापर्यंत येथील समुद्रात पोहताना ११७ जणांना आपला जीव गमावावा लागला.

पर्यटकांनो मुरुडला पर्यटनासाठी या; पण सावधान! आपला जीव लाख मोलाचा आहे, असे आवाहन मुरुडकर करीत आहेत. तीन दिवसांपूर्वी पुणे येथील २१ वर्षीय तरुण पर्यटक जुनेद अतिक शेख यांचाही याच समुद्रात पोहत असताना मृत्यू झाला आहे. प्रशासन दरवर्षी सुरक्षा व्यवस्था असल्याचे सांगत आहे; मात्र, पर्यटकांच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. 

पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
प्रशासन पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कुठे तरी कमी पडत आहे. त्यामुळे पुन्हा आता पर्यटकांच्या सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला आहे. पर्यटकांची संख्या वाढवावी व पर्यटकांचा प्रवास सुखाचा व्हावा, याकरिता प्रशासनाने आतापासूनच कठोर पावले उचलावीत. नाहीतर मुरुड पर्यटन क्षेत्राकडे कोणीही पर्यटक फिरकणार नाहीत. 

या उपाययोजना करणे
n पर्यटक, शालेय विद्यार्थी यांची सहल समुद्राकिनारी आल्यावर त्यांच्या गाडीचे नंबर, शाळेचे नाव, विद्यार्थी संख्या, जिल्हा ठिकाण इत्यादीची नोंद काशिद ग्रामपंचायत पोलिसांकडे करावी. 
n धोक्याचा इशारा म्हणून सायरनचा इशारा वेळोवेळी देण्यात यावा. 
n ध्वनीक्षेपकांद्वारे समुद्राच्या पाण्यात जाऊ नये, याबाबत सूचना देण्यात याव्यात.
n बीच आणि रस्त्यावर जास्तीत जास्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. त्यांच्यामार्फत पर्यटकांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे.
n लाइफ गार्ड व रेस्क्यू बोटींची संख्या वाढवावी.
n पोहतेवेळी बाॅल, रिंगबॉय, रस्सी, लाइफ जॅकेट इत्यादी साधनसामग्री उपलब्ध करून द्यावी.

 

Web Title: Tourists, yaad rakhana samundar bulata hai, lakin hamko janeka nahin!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.