गावोगावी पारंपरिक मूर्तिकार

By admin | Published: September 14, 2015 04:07 AM2015-09-14T04:07:44+5:302015-09-14T04:07:44+5:30

तालुक्यातील गावोगावी पारंपरिक मूर्तिकारांनी वडीलधाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कलाकुसर जतन केली आहे. पेण नगरीप्रमाणे रोहा शहर आणि ग्रामीण भागात हा व्यवसाय वर्षाचे बारा महिने सुरु राहात नाही

The traditional sculptor of the village | गावोगावी पारंपरिक मूर्तिकार

गावोगावी पारंपरिक मूर्तिकार

Next

रोहा : तालुक्यातील गावोगावी पारंपरिक मूर्तिकारांनी वडीलधाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कलाकुसर जतन केली आहे. पेण नगरीप्रमाणे रोहा शहर आणि ग्रामीण भागात हा व्यवसाय वर्षाचे बारा महिने सुरु राहात नाही. केवळ काही महिन्यांपुरतीच मूर्तिकारी मर्यादित राहात असल्याने मूर्तिकारांना इतर वेळी नोकरी व कामासाठी गावाबाहेर जावे लागते. परिणामी मूर्तिकारांची दिवसेंदिवस घटणारी संख्या हा चिंतेचा विषय बनला आहे.
रोहा शहरातील अष्टमी, दमखाडी, धनगर आळी आणि सोनार आळीत तसेच सोनगाव, उडदवणे, सानेगाव, यशवंतखार, महादेवखार, चांडगाव, चणेरा, बुरुमखान, वरसे कोलाड, किल्ला आदी तालुक्यातील गावांत आजही मूर्तिकार शाडूच्या मातीपासून श्रीगणेशाची मूर्ती घडविताना दिसून येतात.
रोहा शहरात व तालुक्यात मिळून साधारण ७५ ते ८० मूर्तिकार व तेवढेच रंगकाम करणारे आहेत. लहान-मोठ्या मिळून साधारण दोन हजार मूर्ती दरवर्षी येथे घडविल्या जातात. यातील पाच ते दहा टक्के मूर्ती विक्री न होता शिल्लक राहात असल्याचे सांगण्यात आले. या व्यवसायातून तालुक्यात साधारण ३८ लाख रुपयांची उलाढाल होत
असते.

Web Title: The traditional sculptor of the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.