शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

वडखळ-अलिबाग मार्गाची चाळण, दुचाकीस्वारांचे होताहेत अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 12:34 AM

वडखळ-अलिबाग महामार्गावरील पडलेले खड्डे वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहेत.

कार्लेखिंड : वडखळ-अलिबाग महामार्गावरील पडलेले खड्डे वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहेत. या मार्गावर ठरावीक ठिकाणी मोठे आणि खोल खड्डे पडलेले आहेत; परंतु या खड्ड्यांचे रूप भयंकर आहे. वडखळपासून धरमतर चेकपोस्ट, धरमतर पुलाच्या अलीकडे, पळी, तीनवीरा या ठिकाणी खड्डे तीव्र स्वरूपाचे आहेत. या खड्ड्यांमध्ये दिवसाला एखादी चारचाकी बंद पडते तर एखादा दुचाकीस्वार पडून अपघाताची साखळी सुरू आहे. सध्या पाऊस पडत आहे, त्यामुळे पाण्याने खड्डे भरले की, वाहनचालकाला या खड्ड्यांचा अंदाज येत नाही.पळी या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यात दुचाकीस्वारांचे अपघात होत आहेत, असे येथील स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. तर धरतमर विभागात रस्त्यालगत मातीचे भराव केले आहेत. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग न केल्यामुळे या रस्त्यावरच अर्धा ते एक फूट पाणी साचत आहे, तर काही ठिकाणी रस्त्याची साइडपट्टीची माती वाहून जाऊन भगदाडे पडली आहेत. हे खड्डे पावसाच्या सुरुवातीपासून पडलेले आहेत. त्यामध्ये एखादे वेळेस खडी, माती टाकली, त्यानंतर या खड्ड्यांकडे संबंधित विभागाचे अक्षरश: दुर्लक्षच आहे आणि याचा त्रास प्रवास करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सहन करावा लागत आहे.याच महामार्गावरील कार्लेखिंड घाटात अलिबागहून पेणकडे येताना पात्रुबाई मंदिरापासूनच्या पहिल्या वळणावर रस्त्याचा कठडा २०-२५ फूट खोल कोसळला आहे. अवजड वाहने जाऊन येथील भाग खचून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही घडलेली घटना संबंधित विभागाच्या लक्षात आणूनसुद्धा या ठिकाणी कोणत्याही प्रकरची सुरक्षा व्यवस्था अथवा सूचना फलक लावलेले नाहीत. यामुळे वाहनचालकांची गैरसोय होत आहे.