मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीत बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 09:59 AM2024-07-10T09:59:29+5:302024-07-10T09:59:41+5:30

वाहनांना पर्यायी मार्गाने तीन दिवस मार्गस्थ व्हावे लागणार आहे.

Traffic changes on Mumbai Goa highway | मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीत बदल

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीत बदल

लोकमत न्यूज नेटवर्क अलिबाग: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कल्याण टोल इन्फा. प्रा. लि. कंपनीतर्फे पुई येथील म्हैसदरा नवीन पुलाचे गर्डर बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम चॅनल नं. ७२/२५५ येथे ११ ते १३ जुलैदरम्यान करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरून हलकी, अवजड व जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. वाहनांना पर्यायी मार्गाने तीन दिवस मार्गस्थ व्हावे लागणार आहे.

सकाळी सहा ते आठ व दुपारी २ ते ४ वाजण्याच्या दरम्यान दोन सत्रात गडर टाकण्याचे काम सुरू राहणार आहे. त्यामुळे वाहतुकीत बदल करण्यात आल्याची माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली आहे.

खोपोली-पाली-वाकणवरून गोव्याकडे जाणारी वाहने पाली- खाळजे-कोलाड किंवा खाळजे-निजामपूर-माणगाववरून पुढे जातील किंवा कोलाड येथून कोलाड- रोहा-भिसे खिंड-वाकण फाटा किंवा नागोठणेवरून वळवून पुढे जातील.

पर्यायी मार्ग

मुंबईहून गोव्याकडे जाताना : वाकण फाटा येथून भिसे खिंड- रोहा-कालाडवरून किवा पाली-खाळजे-कोलाड- खाळजे-निजामपूर येथून माणगाववरून पुढे मार्गस्थ होतील.

गोव्यावरून मुंबईकडे येताना : कोलाड येथून खाळजे- पालीवरून वळवून मुंबईकडे मार्गस्थ होतील किंवा कोलाड येथून खाळजे-पाली-वाकण फाटावरून वळवून मुंबईत येतील.
 

Web Title: Traffic changes on Mumbai Goa highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.