शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
2
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्कतव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
3
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
4
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
5
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
6
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
7
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
8
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
9
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
10
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
11
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
12
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
14
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
15
Vastu Tips: लक्ष्मीविष्णुंना प्रिय असलेले कमळ घरात लावल्याने होणारे आर्थिक लाभ जाणून चकित व्हाल!
16
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
17
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
18
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
19
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
20
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; प्रवासी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 11:40 PM

थर्टीफस्ट सेलिब्रेशनची तयारी; खराब, अरुंद रस्ते, बेशिस्त वाहनचालकांमुळे अडथळा

अलिबाग : थर्टीफस्टच्या सेलिब्रेशनसाठी मोठ्या संख्येने पर्यटक रायगड जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांवर दररोज दाखल होत आहेत. महामार्गाचे सुरू असलेली कामे, अंतर्गत खराब रस्ते आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे मुंबई-गोवा महामार्गासह अलिबाग-वडखळ, मुरुड, श्रीवर्धन आणि नेरळ-माथेरान या ठिकाणी वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्याचा फटका पर्यटकांसह स्थानिकांनाही बसत आहे. वाहतूक सुरळीत राहावी यासाठी पोलिसांवर मात्र ताण पडत आहे.गेल्या आठवड्यात सर्वत्र ख्रिसमस सणाची धूम असल्यानेही अलिबाग, नागाव, आक्षी, वरसोली, किहीम, नवगाव, मांडवा, रेवस, मुरुड, काशिद, श्रीवर्धन, दिवेआगर, हरिहरेश्वर या ठिकणच्या पर्यटनस्थळांवर मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. त्यामुळे येथील पर्यटनस्थळे पर्यटकांनी चांगलीच फुलून गेल्याचे पाहायला मिळाले होते. ख्रिसमसपाठोपाठ आता थर्टीफस्ट साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत आहेत. शनिवार आणि रविवार असल्याने या दिवशीही पर्यटकांची गर्दी झाल्याचे दिसून आले. या ठिकाणची हॉटेल, लॉजिंग, रेस्टारंट, रिसॉर्ट हाऊसफुल्ल झाली आहेत.मुंबई-गोवा या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अद्याप संपलेले नाही. त्यामुळे ठिकठिकाणी कामे सुरू आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले असल्याने वाहतूक अतिशय धीम्या गतीने सुरू आहे. रायगडसह तळकोकणात शिवाय गोव्याकडे जाणारी वाहने याच मार्गाचा वापर करत असल्याने वाहतुकीवर प्रचंड ताण आलेला आहे. बेशिस्त वाहनचालकांमुळे नियमांना फाट्यावर मारले जात असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. या ठिकाणी तैनात करण्यात आलेले पोलीस वाहतूक सुरळीत राहावी यासाठी प्रयत्न करत होते. अलिबाग हे पर्यटकांच्या अतिशय आवडीचे ठिकाण झाले आहे. मुंबई-पुण्यातील वाहने पेण-अलिबाग याच मार्गाने येत असल्याने या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले.मुरुड तालुक्यातही मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत आहेत. या ठिकाणी सलग तीन दिवस पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे येथेही मोठ्या संख्येने पर्यटकांची संख्या वाढली आहे. श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर, हरिहरेश्वर या ठिकाणीही पर्यटकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. या ठिकाणचे रस्तेही लहान, अरुंद असल्याने वाहनचालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. कर्जत तालुक्यातील माथेरान येथेही पर्यटकांनी गर्दी केली आहे. त्यामुळे नेरळ-माथेरान रस्त्यावरही वाहनांची चांगलीच वर्दळ दिसून येत आहे.थर्टीफस्टचे सेलिब्रेशन करण्यासाठी पुढील तीन दिवस आणि नववर्षाच्या सुरुवातीला जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांवर अशीच मोठ्या संख्येने गर्दी अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे पर्यटक, व्यावसायिकांची चांगलीच चंगळ होणार आहे, तर पोलिसांवरील ताण अधिक वाढणार असल्याचे दिसून येते.खासगी वाहनांमध्ये वाढनागोठणे : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेक पर्यटकांनी महाबळेश्वर तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा आणि गोवा राज्याचा मार्ग अवलंबल्याने मुंबई-गोवा महामार्गावर खासगी वाहने आणि बसेसच्या संख्येत वाढ झाल्याने महामार्ग सध्या वाहनांनी फुलून गेला. रविवारी या संख्येत आणखी वाढ होईल असे बोलले जात आहे. महामार्गाच्या पनवेल ते इंदापूर मार्गाचे काम अजूनही पूर्णत्वास गेले नसल्याने पर्यटकांना काही अंशी त्रास सहन करावा लागत असल्याचे स्पष्ट होत आहे. वाहतूक सुरळीत ेसुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.वडखळ ते पेण ५ किलोमीटर वाहनांच्या रांगापेण : सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई, ठाणे, पुणे या महानगरातील हौशी पर्यटकांची पसंती रायगडच्या समुद्रकिनाऱ्यावर मौजमस्ती करण्यावर अधिक असल्याने समुद्रकिनारी नववर्षाच्या स्वागतासाठी आलेल्या पर्यटकांच्या वाहनांची संख्या वाढली असून, मुंबई-गोवा महामार्गावर वडखळ ते पेण या पाच किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. पेण ते वडखळ हे वीस मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी तब्बल दोन तास लागतात. ही वाहतूक कोंडी पुढील दोन दिवस राहणार असून स्थानिक जनतेला व प्रवाशांना याचा मनस्ताप सहन करावा लागणार आहे.पेण येथे महामार्गावर रुंदीकरणाचे काम पेण रेल्वे स्थानक, रामवाडी ते उंबर्डे फाटा या टप्प्यात सुरू आहे. यापुढे उचेडे गावापासून कांदळेपाडा व वडखळ बायपास या ठिकाणीही रुंदीकरणाचे काम सुरू आहे. यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होते, तसे पाहिल्यास दर वीकेंडला वडखळ ते पेण या टप्प्यात वाहतूक कोंडी निर्माण होत असते. मात्र आता २०१९ वर्षाला निरोप व नववर्षाच्या स्वागतासाठी आलेल्या पर्यटकांच्या वाहनांची रेलचेल दिसून येत आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, श्रीवर्धन येथील समुद्रकिनाऱ्यांना आनंद साजरा करण्यासाठी जास्त पसंती आहे.नववर्षाच्या २ जानेवारी २०२०पर्यंत महामार्गावर वाहतूक कोंडीचे चित्र दिसत राहील. वाहतूक पोलीस यंत्रणा महामार्गावर तैनात असूनदेखील वाहनांची प्रचंड गर्दी होत असून रुंदीकरणाच्या सुरू असलेल्या कामामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण होत असते. पर्यटकांनी अतिउत्साहात वाहने चालवू नयेत. नववर्षाचा आनंद आपल्या मित्रपरिवारासह मनसोक्त साजरा करा. अति घाई मसणात नेई, शांत संयमाने वाहने सावकाश चालवा, असे आवाहन वाहतूक पोलीस यंत्रणेने केले आहे.शनिवार व रविवार वीकेंण्डची सुट्टी तर उर्वरित रजा टाकत नववर्षाचे स्वागत करण्यासाठी आलेल्या पर्यटकांची वाहने शनिवारी सकाळपासून पेण शहराजवळून पनवेल व खोपोली बाजूकडून मोठ्या संख्येने येत असल्याचे दिसून आले. रविवारी सायंकाळपर्यंत वाहनांचा ओघ कायम राहणार आहे. स्थानिक वाहतूक कंपन्यांची मालवाहू वाहने या सर्वांमुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. पुढील दोन दिवस स्थानिकांना हा त्रास सहन करावा लागणार आहे.