मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; वीर ते माणगाव मार्गावर २२ किमी वाहनाच्या रांगा
By राजेश भोस्तेकर | Published: September 24, 2023 12:48 PM2023-09-24T12:48:24+5:302023-09-24T12:48:57+5:30
मुंबईकडे येणाऱ्या लेन वर वीर फाटा ते माणगाव या २२ किमी रस्त्यावर तीन ते चार लेनमध्ये वाहनाच्या रांगा लागल्या आहेत.
अलिबाग : पाच दिवसांच्या गणरायांचे विसर्जन करून चाकरमानी गणेशभक्त परतीच्या प्रवासाला लागले आहेत. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर मुंबई कडे येणाऱ्या लेन वर वाहतूक कोंडी झाली आहे. वीर ते माणगाव या २२ किमी दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडीत गणेशभक्त अडकले आहेत. बेशिस्त वाहन चालकांमुळे प्रवाशांना फटका बसला आहे. वाहतूक पोलिसांची मात्र ही कोंडी सोडविण्याची पंचायत झाली आहे.
शनिवारी गणपती आणि गौरीचे विसर्जन गणेशभक्तांनी वाजत गाजत केले. गणेशोत्सव सणाला लाखो गणेशभक्त हे कोकणात गेले होते. गणरायाचे विसर्जन करून पुन्हा चाकरमानी गणेशभक्त हे खाजगी वाहनाने, एस टी ने पुन्हा परतीच्या मार्गाला रविवारी निघाले आहेत. मात्र या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आहे.
अलिबाग : पाच दिवसांच्या गणरायांचे विसर्जन करून चाकरमानी गणेशभक्त परतीच्या प्रवासाला लागले आहेत. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर मुंबई कडे येणाऱ्या लेन वर वाहतूक कोंडी झाली आहे. वीर ते माणगाव या २२ किमी दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडीत गणेशभक्त अडकले आहेत. pic.twitter.com/oad0vCJ6TA
— Lokmat (@lokmat) September 24, 2023
मुंबईकडे येणाऱ्या लेन वर वीर फाटा ते माणगाव या २२ किमी रस्त्यावर तीन ते चार लेनमध्ये वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे साधारण चार ते पाच तास प्रवासी हे वाहतूक कोंडीत अडकले आहेत. वाहतूक पोलीस यांचे परतीच्या प्रवासाचे नियोजन चुकल्याचे दिसत आहे. बेशिस्त वाहन चालक ही या वाहतूक कोंडीला जबाबदार असल्याचे दिसत आहे.