वाहतूककोंडी : प्रवाशांचे हाल; प्रशासन हतबल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2019 01:00 AM2019-09-02T01:00:36+5:302019-09-02T01:00:41+5:30

सुकेळी खिंडीतही वाहतुकीची कोंडी होत आहे हे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी कोकणात जाणारी वाहने भिसे खिंड

Traffic congestion: Passenger status; The administration is desperate | वाहतूककोंडी : प्रवाशांचे हाल; प्रशासन हतबल

वाहतूककोंडी : प्रवाशांचे हाल; प्रशासन हतबल

Next

नागोठणे : गणेशोत्सवासाठी मुंबई-गोवा महामार्गावरून जाणाऱ्या गणेशभक्तांना महामार्गावर पडलेले खड्डे आणि मुसळधार पाऊस यामुळे रविवारी कमालीचा त्रास सहन करावा लागला. महाड, रत्नागिरी तसेच मुंबईकडे जाणाºया दोन्ही बाजूकडे वाहनांची वर्दळ वाढल्याने नागोठणेतील बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुल ते वाकण या चार किलोमीटर मार्गात दुपारपर्यंत मोठी वाहतूककोंडी झाली होती. महामार्गावर वाहतूककोंडी झाल्याने मुंबईकडून कोकणात जाणाºया कार, जीपसारख्या वाहनांनी शहरातील शिवाजी चौकातून आपली वाहने नेण्याचा प्रयत्न केल्याने या ठिकाणीही वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती.

सुकेळी खिंडीतही वाहतुकीची कोंडी होत आहे हे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी कोकणात जाणारी वाहने भिसे खिंड, रोहेमार्गे कोलाडकडे वळविली.

१महाड : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाºया चाकरमान्यांना महामार्गाची दुरवस्था तसेच वाहतूककोंंडीमुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागला. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाºया चाकरमान्यांना दरवर्षी वाहतूककोंडीचा दरवर्षी सामना करावा लागतो.

२यंदाही महामार्गावरील वाहतूककोंडी रोखण्यासाठी प्रशासनाला अपयश आल्याचे रविवारी स्पष्ट झाले. गणेशोत्सवाच्या काळात वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या होत्या. मात्र, वाहतूककोंडीसाठी नियोजन केलेल्या सर्वच उपाययोजना निष्फळ ठरल्याने महामार्गावर वाहनांचा तासन्तास खोळंबा झाला.

३मुंबईहून कोकणात शनिवारी रात्री एसटीने प्रवास करणाºया हजारो चाकरमान्यांचे वाहतूककोंडीमुळे प्रचंड हाल झाले. मुंबईतून महाडमध्ये पोहोचण्यासाठी प्रवाशांना तब्बल १५ ते १६ तास लागले, ‘असा जीवघेणा प्रवास नको रे बाबा’, अशी म्हणण्याची वेळ प्रवासात हैराण झालेल्या चाकरमान्यांवर आली आहे.

पनवेल रेल्वे, बस डेपोत चाकरमान्यांची गर्दी
च्पनवेल : कोकणात जाणारे बहुतांश चाकरमानी पनवेल रेल्वे स्थानक, बसस्थानकातून प्रवास करीत आहेत. त्यामुळे सध्या या ठिकाणी मोठी गर्दी होत आहे. त्यातच पनवेल शहरात विजेचा लपंडाव सुरू झाल्याने नागरिकांसह सार्वजनिक मंडळेही हैराण झाली आहेत. ऐन उत्सवाच्या तोंडावर वीजपुरवठा खंडित होत असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

च्पनवेल रेल्वे स्थानकात कोकणात जाणाºया गाड्या पकडण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. प्रवाशांच्या तुलनेत गाड्यांची संख्या कमी असल्याने प्रवाशांना जागा मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. हीच अवस्था बसस्थानकातही आहे.
च्पनवेल शहरात मोठ्या प्रमाणात महावितरणच्या विद्युतवाहिन्या जीर्ण झाल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावल्याने पुन्हा एकदा पावसाचा फटका बसला आहे. विशेष म्हणजे, खारघर, कळंबोली सारख्या भागातही विजेचा लपंडाव पाहावयास मिळाला.
च्एकीकडे सार्वजनिक गणेश मंडळे विविध देखावे तसेच मंडळाच्या सजावटीत व्यस्त असताना विजेचा लपंडाव सुरू झाल्याने मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. उत्सवकाळात वीजपुरवठा देताना विविध कागदपत्रांची पूर्तता, परवानगी देण्याची मागणी महावितरणकडून होत असते.

Web Title: Traffic congestion: Passenger status; The administration is desperate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.