लेनची शिस्त न पाळणाऱ्या वाहन चालकांमुळे गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2018 04:22 PM2018-05-05T16:22:07+5:302018-05-05T16:22:07+5:30
गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगाव शहराच्या अलिकडे व पलिकडे, लेनची शिस्त न पाळणाऱ्या वाहन चालकांमुळे शनिवारी (ता. 5 मे ) सकाळपासून प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.
रायगड- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगाव शहराच्या अलिकडे व पलिकडे, लेनची शिस्त न पाळणाऱ्या वाहन चालकांमुळे शनिवारी (ता. 5 मे ) सकाळपासून प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. माणगांव शहराच्या अलिकडे व पलीकडे किमान तिन किमी अंतरा पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या असल्याची माहिती प्रत्यक्ष या वाहतूक कोंडीत अडकलेले पालीवाला कॉलेजचे उप प्राचार्य प्रा.सुधीर पुराणीक यांनी लोकमत शी बोलताना दिली आहे.
जागा मिळेल तेथून बेदरकारपणे ओव्हरटेक करत, एका गाडीला तिन-तिन गाड्या समांतर महामागार्वर उभ्या राहात असल्याने ही वाहतूक कोंडी होत आहे.
जेमतेम २ किमी. अंतराकरीता १ तास २० मि. वेळ लागल्याचे प्रा.पुराणीक यांनी सांगितलं. केवळ लेनची शिस्त सगळ्यांनी पाळली तर वाहतूक एकदम सुरळीत राहील, परंतु या मानसिकतेत येथे कोणताही वाहन चालक दिसून येत नसल्याचे ते म्हणाले.
वाहतूक पोलिंसांची संख्या मर्यादीत आहे, परंतु आहेत ते चार पोलीस भर उन्हात वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करित आहेत. दर ५०० मिटर वर वाहतूक पोलीस ठेवणे केवळ अशक्य आहे. वाहन चालकांनी बेदरकारपणे वाहतूकीची शिस्त न पाळता गाड्या चालवायच्या आणि वाहन कोंडी झाली म्हणून वाहतूक पोलिसांना जबाबदार धरायचे याला काही अर्थ नसल्याचे प्रा.पुराणीक अखेरीस म्हणाले.