Traffic Jam: मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, वाकण येथे तीन चार किलोमीटर पर्यंत वाहनाच्या रांगा

By राजेश भोस्तेकर | Published: September 18, 2022 12:11 PM2022-09-18T12:11:15+5:302022-09-18T12:14:21+5:30

Mumbai Goa highway: मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडीचा त्रास रविवारी पुन्हा प्रवाशांना बसला आहे. महामार्गावर वाकण फाटा येथे वाहतूक कोंडी झाली आहे. तीन ते चार किलोमीटर पर्यंत वाहनाच्या रांगा लागलेल्या आहेत. 

Traffic jam on Mumbai Goa highway, queues of vehicles up to three to four kilometers at Wakan | Traffic Jam: मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, वाकण येथे तीन चार किलोमीटर पर्यंत वाहनाच्या रांगा

Traffic Jam: मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, वाकण येथे तीन चार किलोमीटर पर्यंत वाहनाच्या रांगा

Next

- राजेश भोस्तेकर

अलिबाग : मुंबई गोवा महामार्गावरवाहतूक कोंडीचा त्रास रविवारी पुन्हा प्रवाशांना बसला आहे. महामार्गावर वाकण फाटा येथे वाहतूक कोंडी झाली आहे. तीन ते चार किलोमीटर पर्यंत वाहनाच्या रांगा लागलेल्या आहेत. 

वाकण पुलावर ट्रक बंद पडल्याने आणि पडलेल्या खड्याने ही वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न वाहतूक पोलिसांकडून सुरू आहे.

रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने पर्यटनास बाहेर पडलेल्या प्रवाशांना मुंबई गोवा महा मार्गावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. महा मार्गावर पडलेले खड्यामुळे वाहनाचा वेग मंदावला आहे. त्यातच वाकण येथे ट्रक बंद पडला आहे. त्यामुळे वाकण येथे वाहनाच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. साधारण तीन ते चार किलोमीटर पर्यंत ह्या वाहनाच्या रांगा लागलेल्या आहेत. त्यामुळे प्रवाशाची वाहने संथ गतीने पुढे सरकत आहेत. महामार्गावर खड्डे आणि वाहतूक कोंडी हा नेहमीचाच प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: Traffic jam on Mumbai Goa highway, queues of vehicles up to three to four kilometers at Wakan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.