माथेरान - मुसळधार पावसामुळे माथेरान घाटरस्त्यामध्ये रविवारी दरड कोसळली होती. त्यामुळे काही काळ वाहतूककोंडी झाली होती. या घाट रस्त्याच्या दुरुस्तीचे नव्याने होत असलेले काम मुंबई महानगर विकास प्राधिकरणाअंतर्गत केले जात आहे. त्यामुळे त्यांच्या पथकाने घाटात पडलेला मोठा कातळ बाजूला करून वाहतूक पूर्वपदावर आणली. परंतु पावसामुळे घाटात सर्वत्र खडी पसरल्याने दुचाकीस्वारांना वाहन चालवताना कसरत करावीलागली.माथेरान घाट रस्त्यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाअंतर्गत ही जवळपास ३६ कोटी रु पयांची कामे केली जात आहेत.आतापर्यंत नेरळपासून अगोदरच सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेल्या संरक्षण भिंतीवर कठडे उभारलेले आहेत. अनावश्यक ठिकाणी सुध्दा या भिंती उभारलेल्या आहेत. तर काही ठिकाणी जुन्याच लोखंडी रेलिंगला सिमेंट काँक्र ीट करून ही जुनी लोखंडी रेलिंग झाकण्यासाठी प्रयत्न करण्या आला आहे.अतिवृष्टीमुळे घाटातील दगड रस्त्यावर येत असल्याने अनेकदा वाहतूक मंदावत असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.
माथेरान घाटातील वाहतूक पूर्ववत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 4:15 AM