शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

महामार्गावरील वाहतूककोंडी सुटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 6:07 AM

महामार्गावर दररोज कोठे ना कोठे तरी अपघात होतच आहेत. सध्या सुरू असलेली लग्नसराई, सुट्टीचा काळ आणि कोकणातील पर्यटकांची गर्दी

सिकंदर अनवारे  दासगाव : महामार्गावर दररोज कोठे ना कोठे तरी अपघात होतच आहेत. सध्या सुरू असलेली लग्नसराई, सुट्टीचा काळ आणि कोकणातील पर्यटकांची गर्दी, यामुळे गेल्या महिन्याभरापासून मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूककोंडी आणि अपघात सत्र सुरू आहे. शुक्र वारी मध्यरात्री दासगावजवळ तीन वाहनांच्या अपघातात जवळपास तीन तास महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. याला बेशिस्त वाहनचालक जबाबदार असल्याचे दिसून आले आहे.कोकणातील चाकरमानी सध्या सुट्टीकरिता गावी येत आहेत. सुट्टीतील मजा अवलंबण्यासाठी परराज्यातूनही पर्यटक मोठ्या प्रमाणात कोकणाचे सौंदर्य पाहण्यासाठी येत आहेत. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे सुरू असलेले काम आणि महामार्गावरील गर्दी यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. त्यातच अपघात मालिकाही कायम सुरू आहे. लवकर पोहोचण्याची घाई, ओव्हरटेक करण्याच्या नादात वाहनचालक बेशिस्तपणे वाहन चालवत आहेत. रस्त्याचे सुरू असलेले काम पाहता, वाहनचालकांनी आपले वाहन एका लेनमध्ये चालवणे अपेक्षित आहे. मात्र, महिन्याभरात झालेले बहुतांश अपघात हे ओव्हरटेकच्या नादात झाल्याचे दिसून येत आहे.शुक्र वारी मध्यरात्री तीन वाहने एकमेकांवर आपटल्याने वाहनांचे नुकसान झालेच; पण महामार्ग जवळपास दोन तास ठप्प झालाहोता.दासगाव खिंडीतील चढावाच्या ठिकाणी एक अवजड वाहन कमी वेगात चालत असतानाच, मागून येणारा कंटेनर आणि पिकअप जिप या दोन वाहनांना भरधाव येणाऱ्या लक्झरी बसने जोरात धडक दिली. यामुळे महामार्गावर वाहतूककोंडी होऊन प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.दरम्यान बेशिस्तपणे वाहन चालवत एकेरी लेन सोडून पुढे जाणाºया वाहनांमुळेही महामार्गावर वाहन चालवणे कठीण होऊन बसत आहे. बेशिस्त चालकांवर पोलिसांनी कडक कारवाई करणे अपेक्षितआहे.मुंबई-गोवा महामार्गावर सुरू असलेले चौपदरीकरणाचे काम काही ठिकाणी संथ गतीने सुरू आहे. त्यातच अनेक ठिकाणी साइडपट्टीला मातीचे ढीग पडले आहेत. तर काही ठिकाणी साइडपट्टीच शिल्लक राहिलेली नाही. या सर्व कारणांमुळे वाहतूककोंडी होत आहे. या महामार्गावर माणगाव, कोलाड, वडखळ, या ठिकाणी बाजारपेठ महामार्गाच्या कडेलाच वसली असल्याने कायम वाहतूककोंडी होत आहे.वडखळ आणि पनवेलमधील वाहतूककोंडी टाळण्याकरिता अनेक जण पालीमार्गे मुंबईचा पर्याय निवडत होते. मात्र, या मार्गाचेही काम सुरू केल्याने या मार्गाकडेदेखील प्रवाशांनी पाठ फिरवली आहे.टोलनाक्यावर कर्मचारी तैनात कशाला?महामार्ग वाहतूक पोलीस विभागाकडे आधीच पोलीस कर्मचारी अपुरे असताना, महाडसह इतर विभागातील महामार्ग पोलीस कर्मचारी खालापूर टोलनाक्यावर नेऊन का बसवले जात आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे.कोकणात जाणारी वाढलेली वाहनसंख्या आणि महामार्गावर होणारे अपघात, वाहतूककोंडी यामुळे या ठिकाणी अधिक पोलीस कर्मचारी गरजेचे असतानाही खालापूर टोलनाक्यावर पोलीस तैनात केले जात असल्याने महामार्ग वाहतूक पोलीस विभागाबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.