पार्किंगमुळे प्रवाशांना त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 02:29 AM2017-08-02T02:29:42+5:302017-08-02T02:29:42+5:30
नेरळ शहरात वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला असून, नेरळ बसस्थानकापासून पुढे नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरून जाणाºया रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दुचाकी अनधिकृतपणे पार्क केल्या जातात.
नेरळ : नेरळ शहरात वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला असून, नेरळ बसस्थानकापासून पुढे नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरून जाणाºया रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दुचाकी अनधिकृतपणे पार्क केल्या जातात. त्यामुळे रेल्वेस्थानकाकडे आणि बाजारपेठेत ये-जा करणाºया प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे; परंतु याकडे नेरळ वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नेरळ शहरात मोठ्या प्रमाणात वसाहती वाढल्याने नेरळ शहराची लोकसंख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे साहजिकच त्याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे. दुचाकीधारक रस्त्यावर दुचाकी पार्क करत असल्याने अनेक वेळा वाहतूककोंडीही होते. नेरळ बसस्थानकापासून पुढे नेरळ रेल्वेस्थानकाकडे जाणाºया रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनचालक आपल्या दुचाकी पार्क करतात, त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करताना नागरिकांना त्रास सहन करावा लागतो, असे असताना स्थानिक ग्रामपंचायत आणि वाहतूक पोलिसांनी मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने प्रवासी व ये-जा करणाºया नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
भररस्त्यावर दुचाकी किंवा चारचाकी पार्क केली असताना मात्र पोलीस अशा वाहनचालकांवर कारवाई का करत नाही? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. तसेच नेरळमुळे नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राकडे येणाºया रु ग्णांनाही मनस्ताप सहन करावा लागतो आहे. येथून जाण्यासाठी रस्ता नसल्याने अडचण होत आहे, तरी स्थानिक ग्रामपंचायत आणि वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देऊन, अशा अनधिकृत पार्क केलेल्या दुचाकीधारकांवर कारवाई करावी व हा रस्ता मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत
आहे.