माणगावात मोर्बा पुलावरील वाहतूक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 11:28 PM2019-08-03T23:28:05+5:302019-08-03T23:28:25+5:30

अनेक गावांचा संपर्क तुटला; पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली

Traffic stop on Morba Bridge in Managua | माणगावात मोर्बा पुलावरील वाहतूक बंद

माणगावात मोर्बा पुलावरील वाहतूक बंद

googlenewsNext

माणगांव : तालुक्यातील माणगाव मोर्बा पुलावर आलेल्या पाण्यामुळे शनिवारी वाहतूक बंद ठेवण्यात आली. २६ जुलैपासून सतत पडणाऱ्या पावसाने मोर्बा नदीवरील पुलावरून पाणी जात असल्यामुळे श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेआगर, म्हसळा इकडे जाणाºया गाड्यांची वाहतूक बंद करण्यात आली. ही वाहतूक मांजरोणे, गोरेगावमार्गे फिरवण्यात आली होती. तसेच म्हसळा साई-माणगावकडे जाणारी वाहतूक तळेगाव खरवली मार्गे फिरवण्यात आली होती.

साई मोर्बा विभागात असणाºया नद्या दुथडी भरून वाहत असून नदी किनारी असणाºया घरांमध्ये पाणी घुसले. तर काही गावांचा संपर्क तुटला. कचेरी रोड वरील साबळे हायस्कुलच्या आवारात पाणी तुंबल्याने विद्यार्थ्यांना सुटी देण्यात आली. माणगाव काळ नदी दुथडी भरून वाहत होती. माणगांवमधील खांदाड, बामणोली रोड, माणगांव रेल्वे स्टेशन, खरवली फाटा आदी परिसरात पाणी तुंबले होते.

लोणेरे-श्रीवर्धन व माणगाव-श्रीवर्धन रस्ता बंद
माणगाव तालुक्यात माणगाव, गोरेगाव, इंदापूर , निजामपूर, भिरा- पाटनूसमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील काळ नदी, गोद नदी, सावित्री नदीचे पात्राने धोकादायक पातळी ओलांडली आहे. मुंबई गोवा महामार्गावर असणारे मौजे कळमजे येथील ब्रिज वरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद करण्याचे पत्र महामार्ग विभागाकडून देण्यात आले. श्रीवर्धन माणगाव रस्ता बंद केल्यामुळे वाहतुकीची कोंडी माणगाव शहरात झाली. तसेच गोरेगाव येथे काळ नदीला पुर आल्याने लोणेरे श्रीवर्धन रस्ता देखील वाहतुकीस बंद ठेवण्यात आला. या सर्व गोष्टीमुळे चालकांना नाहक त्रास सहन करावा लागला.

Web Title: Traffic stop on Morba Bridge in Managua

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस