वडवली येथे दोन गटांत हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 01:07 AM2019-04-13T01:07:15+5:302019-04-13T01:07:17+5:30

नेरळ पोलीसठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल

The tragedy in two groups at Vadli | वडवली येथे दोन गटांत हाणामारी

वडवली येथे दोन गटांत हाणामारी

Next

नेरळ : वडवली गावातील बौद्धवाडामधील दोन गटांत किरकोळ वादातून हाणामारी झाली. त्यात लाकडी दांडके आणि लोखंडी सुरीमुळे हाणामारीत काही जण जखमी झाले आहेत.


नेरळ-कर्जत रस्त्यावर असलेल्या वडवली गावातील अनंत हरिचंद्र सोनावणे हे १० एप्रिल रोजी सायंकाळी आपल्या घराच्या गच्चीवर उभे असताना त्यांना शिवीगाळ केली. त्याचा जाब विचारण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील काही जण फिर्यादीसह गेले असता त्यांना लाकडी दांडक्यांनी मारहाण करण्यात आली, तर दोन महिलांना शिवीगाळ करण्यात आली. त्याचा राग आल्याने लाकडी दांडक्याने मारहाण झालेले सोनावणे कुटुंबाने आपल्या अंगणातून जाताना प्रेम मनोहर सोनावणे आणि अन्य आठ लोकांना यांना प्रथम शिवीगाळ आणि नंतर मारहाण केली. हे भांडण सोडविण्यासाठी पुढे आलेल्या तिघांवर सुरीने वार केले असून यात दोघे जखमी झाले आहेत. तर काहींना बेंजोचे लोखंडी स्टॅण्ड यांच्या साहाय्याने मारहाण करण्यात आल्याने ते जखमी झाले आहेत. वडवली गावातील हाणामारीची फिर्याद अनंत हरिचंद्र सोनावणे आणि प्रेम मनोहर सोनावणे यांनी दिली असून नेरळ पोलीसठाण्यात परस्परविरोधी गुन्हे नोंद केले
आहेत.


अनंत सोनावणे यांनी दिलेल्या फिर्यादीत सुभाष धाऊ सोनावणे, प्रेम मनोहर सोनावणे, सिद्धार्थ भीमराव सोनावणे, उज्ज्वल सुभाष सोनावणे, संभाजी धाऊ सोनावणे, सुजाता सुभाष सोनावणे आणि अरुणा मनोहर सोनावणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

जखमींवर सरकारी रु ग्णालयात उपचार
प्रेम मनोहर सोनावणे यांच्या फिर्यादीत सूर्यकांत गायकवाड, उमेश गायकवाड, नीलेश गायकवाड, राजेश गायकवाड, रतन गायकवाड, मिलिंद गायकवाड, तानाजी गायकवाड, संदीप गायकवाड यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या मारहाण प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी दिली. पुढील तपास सुरू असून जखमींवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे जाधव यांनी सांगितले.

Web Title: The tragedy in two groups at Vadli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.