अंगणवाडी सेविकांना कॉमन अ‍ॅप्लिकेशन सॉफ्टवेअरचे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 10:58 PM2019-06-07T22:58:07+5:302019-06-07T22:58:28+5:30

११८ मोबाइलचे वाटप : पोषण अभियानअंतर्गत उपक्रम

Training of Common Application Software for Anganwadi Sevikas | अंगणवाडी सेविकांना कॉमन अ‍ॅप्लिकेशन सॉफ्टवेअरचे प्रशिक्षण

अंगणवाडी सेविकांना कॉमन अ‍ॅप्लिकेशन सॉफ्टवेअरचे प्रशिक्षण

googlenewsNext

म्हसळा : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पोषण अभियानअंतर्गत रीड टाइम मॉनिटरिंग या उपक्रमाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून अंगणवाडी सेविकांचे कॉमन अ‍ॅप्लिकेशन सॉफ्टवेअरचे प्रशिक्षण एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय म्हसळा येथे संपन्न झाले. या वेळी तालुक्यातील एकूण ११८ अंगणवाडी सेविकांना मोबाइलचे वाटप करण्यात आले.

बालवयापासून स्पर्शाने शैक्षणिक आकलन व्हावे त्यासाठी शासनाने राज्यातील सर्व अंगणवाडी सेविकांना एक विशेष अ‍ॅप तयार केला असून राज्यातील सर्व सेविका सक्षम व्हाव्यात हा या प्रशिक्षणामागील मुख्य उद्देश असल्याचे बालविकास अधिकारी व्यंकट तरवडे यांनी प्रास्ताविकात सांगितले. तालुक्यातील सर्व अंगणवाड्या डिजिटल होण्याच्या दृष्टीने शासनाने विविध उपक्रमशील उपक्रम हाती घेतले असून राज्यातील सर्व अंगणवाडीचा कारभार अ‍ॅपच्या माध्यमातून निश्चितपणे सक्षम होईल. रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वाटप करण्यात आलेल्या मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून रोजच्या कामांचा आढावा अद्ययावत ठेवण्यास मदत होईल, असे सभापती छाया म्हात्रे यांनी सांगितले. 

Web Title: Training of Common Application Software for Anganwadi Sevikas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.