आपत्तीप्रवण क्षेत्रातील नागरिकांना प्रशिक्षण

By admin | Published: June 16, 2017 02:14 AM2017-06-16T02:14:09+5:302017-06-16T02:14:09+5:30

चालू पावसाळ््यातील संभाव्य नैसर्गिक आपत्तीबाबत जागृती आणि प्रत्यक्ष मुकाबला प्रशिक्षण जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील नागरिकांना देण्याकरिता नॅशनल

Training for disaster-prone citizens | आपत्तीप्रवण क्षेत्रातील नागरिकांना प्रशिक्षण

आपत्तीप्रवण क्षेत्रातील नागरिकांना प्रशिक्षण

Next

- जयंत धुळप। लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : चालू पावसाळ््यातील संभाव्य नैसर्गिक आपत्तीबाबत जागृती आणि प्रत्यक्ष मुकाबला प्रशिक्षण जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील नागरिकांना देण्याकरिता नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (एनडीआरएफ) अर्थात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलास जिल्ह्यात १५ दिवसांकरिता पाचारण करण्यात आले आहे. या दलामार्फत येथील नागरिकांना आपत्तीविषयी प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख तथा रायगडचे निवासी उप जिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.
गेल्या २००५ पासून नैसर्गिक आपत्तीचे धक्के सोसलेल्या, नैसर्गिक आपत्तीप्रवण रायगड जिल्ह्यात गतवर्षीच्या पावसाळ््यात ३ आॅगस्ट २०१६ च्या रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरील महाड-पोलादपूर दरम्यानचा सावित्री नदीवरचा १०० वर्षे जुना पूल मुसळधार पावसात वाहून गेला. पुलावरून जाणाऱ्या दोन एसटी बसेस व अन्य एक तवेरा गाडी नदीत वाहून गेल्याने मोठ्या मानवीहानीस सामोरे जावे लागले आणि पुन्हा एकदा रायगड जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीची समस्या ऐरणीवर आली. सावित्री नदी पूल दुर्घटनेच्या ‘एनडीआरएफ’ने शोधकार्यात रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि पोलीस यंत्रणेस मोठे सहकार्य केले होते.
कोणतीही नैसर्गिक आपत्ती घडल्यावर तेथे असणारा सर्वसामान्य माणूस हाच आपत्तीचा ‘प्रथम प्रतिसादक’ असतो आणि त्यालाच डोळ््यासमोर ठेवून या प्रशिक्षणाचे आयोजन शुक्रवारी १६ जून २०१७ ते शुक्रवार ३० जून २०१७ या १५ दिवसांच्या कालावधीत रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यांत ‘एनडीआरएफ’चे पोलीस निरीक्षक अनंता बाभुळकर यांच्या नेतृत्वाखालील ३० सदस्यांच्या पथकाच्या माध्यमातून करण्यात आले. याबाबतची माहिती रायगड जिल्हा आपत्ती नियंत्रण अधिकारी सागर पाठक यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकारी, कर्मचारी, पोलीस विभाग, पोलीस पाटील, तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, होमगार्ड, स्वयंसेवक, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते, सर्व शासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी, एनसीसी व एनएसएसचे विद्यार्थी,नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक आदि सर्वांना या प्रशिक्षणात सहभागी करुन घेण्यात येणार असल्याचे पाठक यांनी सांगितले.
महाड-पोलादपूरमधील या पूर्वीच्या पूर व दरड कोसळण्याच्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर २६ जून २०१७ रोजी या आपत्तीस सामोरे जाण्याकरिताचे प्रशिक्षण देवून, या संदर्भातील रंगीत तालीम (मॉकड्रील) देखील येथे ‘एनडीआरएफ’च्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे पाठक यांनी सांगितले.

नैसर्गिक आपत्तीपासून बचावासाठी माहिती
- राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली देशात कार्यरत आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या आदेशान्वये पुणे येथील ‘एनडीआरएफ’ बटालीयन-०५चे कमांडंट अनुपम श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही हे आपत्ती मुकाबला प्रशिक्षण रायगडमधील नागरिकांना व संबंधित यंत्रणांना देणार आहोत.
- नैसर्गिक आपत्ती आलीच तर त्याचा पहिला फटका ज्या नागरिकास बसणारा असा ‘प्रथम प्रतिसादक’, आपत्तीचा मुकाबला करण्याकरिता प्रशिक्षित असेल तर आपत्तीमधील मानवी व वित्तीय हानी कमी होण्यास मोठी मदत होते, या सूत्रावर आधारित हे संपूर्ण प्रशिक्षण असते, अशी माहिती ‘एनडीआरएफ’पथकाचे प्रमुख अनंता बाभुळकर यांनी दिली आहे.

रायगड आपत्ती प्रतिसाद दल प्रशिक्षण व जनजागृती अभियान
अ.क्र.प्रशिक्षण दिनांकठिकाण
११६ जून २०१७पेण
२१७ जून २०१७अलिबाग
३१८ जून २०१७मुरूड
४१९ जून २०१७रोहा
५२० जून २०१७नागोठणे
६२१ जून २०१७पाली-सुधागड
७२२ जून २०१७माणगाव
८२३ जून २०१७तळा
९२४ ते २६ जून २०१७महाड
१०२७ जून २०१७श्रीवर्धन व म्हसळा
११२८ जून २०१७पनवेल व उरण
१२२९ जून २०१७कर्जत
१३३० जून २०१७ खालापूर

दरड कोसळण्याचा संभाव्य धोका असणारी गावे
अ.क्र.तालुकागावेलोकसंख्या
०१महाड३२९,८८८
०२पोलादपूर२५११,२९२
०३खालापूर०६१,९६६
०४माणगांव०३१,१५३
०५तळा०२३२२
०६रोहा०४१,७२६
०७पनवेल०२५७९
०८सुधागड०११४५
०९म्हसळा०४६६६
१०तळा०२३२२
११श्रीवर्धन०१२५६
१२मुरुड०२९०७
८४२०,३२९

रायगड किनारी भागातील गावे
अ.क्र.किनारा प्रकारगावलोकसंख्या
१नदी किनारा२७३३,५८,१८४
२समुद्र किनारा५३१,७३,४३४
३खाडी किनारा८१९५,३५२

१६ जून ते शुक्रवार ३० जून २०१७ या पंधरा दिवसांच्या कालावधीत रायगड जिल्ह्यातील
१५ तालुक्यांत ‘एनडीआरएफ’चे प्रशिक्षण

Web Title: Training for disaster-prone citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.