शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

आपत्तीप्रवण क्षेत्रातील नागरिकांना प्रशिक्षण

By admin | Published: June 16, 2017 2:14 AM

चालू पावसाळ््यातील संभाव्य नैसर्गिक आपत्तीबाबत जागृती आणि प्रत्यक्ष मुकाबला प्रशिक्षण जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील नागरिकांना देण्याकरिता नॅशनल

- जयंत धुळप। लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : चालू पावसाळ््यातील संभाव्य नैसर्गिक आपत्तीबाबत जागृती आणि प्रत्यक्ष मुकाबला प्रशिक्षण जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील नागरिकांना देण्याकरिता नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (एनडीआरएफ) अर्थात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलास जिल्ह्यात १५ दिवसांकरिता पाचारण करण्यात आले आहे. या दलामार्फत येथील नागरिकांना आपत्तीविषयी प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख तथा रायगडचे निवासी उप जिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.गेल्या २००५ पासून नैसर्गिक आपत्तीचे धक्के सोसलेल्या, नैसर्गिक आपत्तीप्रवण रायगड जिल्ह्यात गतवर्षीच्या पावसाळ््यात ३ आॅगस्ट २०१६ च्या रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरील महाड-पोलादपूर दरम्यानचा सावित्री नदीवरचा १०० वर्षे जुना पूल मुसळधार पावसात वाहून गेला. पुलावरून जाणाऱ्या दोन एसटी बसेस व अन्य एक तवेरा गाडी नदीत वाहून गेल्याने मोठ्या मानवीहानीस सामोरे जावे लागले आणि पुन्हा एकदा रायगड जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीची समस्या ऐरणीवर आली. सावित्री नदी पूल दुर्घटनेच्या ‘एनडीआरएफ’ने शोधकार्यात रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि पोलीस यंत्रणेस मोठे सहकार्य केले होते.कोणतीही नैसर्गिक आपत्ती घडल्यावर तेथे असणारा सर्वसामान्य माणूस हाच आपत्तीचा ‘प्रथम प्रतिसादक’ असतो आणि त्यालाच डोळ््यासमोर ठेवून या प्रशिक्षणाचे आयोजन शुक्रवारी १६ जून २०१७ ते शुक्रवार ३० जून २०१७ या १५ दिवसांच्या कालावधीत रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यांत ‘एनडीआरएफ’चे पोलीस निरीक्षक अनंता बाभुळकर यांच्या नेतृत्वाखालील ३० सदस्यांच्या पथकाच्या माध्यमातून करण्यात आले. याबाबतची माहिती रायगड जिल्हा आपत्ती नियंत्रण अधिकारी सागर पाठक यांनी दिली आहे. जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकारी, कर्मचारी, पोलीस विभाग, पोलीस पाटील, तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, होमगार्ड, स्वयंसेवक, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते, सर्व शासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी, एनसीसी व एनएसएसचे विद्यार्थी,नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक आदि सर्वांना या प्रशिक्षणात सहभागी करुन घेण्यात येणार असल्याचे पाठक यांनी सांगितले. महाड-पोलादपूरमधील या पूर्वीच्या पूर व दरड कोसळण्याच्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर २६ जून २०१७ रोजी या आपत्तीस सामोरे जाण्याकरिताचे प्रशिक्षण देवून, या संदर्भातील रंगीत तालीम (मॉकड्रील) देखील येथे ‘एनडीआरएफ’च्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे पाठक यांनी सांगितले.नैसर्गिक आपत्तीपासून बचावासाठी माहिती- राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली देशात कार्यरत आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या आदेशान्वये पुणे येथील ‘एनडीआरएफ’ बटालीयन-०५चे कमांडंट अनुपम श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही हे आपत्ती मुकाबला प्रशिक्षण रायगडमधील नागरिकांना व संबंधित यंत्रणांना देणार आहोत. - नैसर्गिक आपत्ती आलीच तर त्याचा पहिला फटका ज्या नागरिकास बसणारा असा ‘प्रथम प्रतिसादक’, आपत्तीचा मुकाबला करण्याकरिता प्रशिक्षित असेल तर आपत्तीमधील मानवी व वित्तीय हानी कमी होण्यास मोठी मदत होते, या सूत्रावर आधारित हे संपूर्ण प्रशिक्षण असते, अशी माहिती ‘एनडीआरएफ’पथकाचे प्रमुख अनंता बाभुळकर यांनी दिली आहे.रायगड आपत्ती प्रतिसाद दल प्रशिक्षण व जनजागृती अभियानअ.क्र.प्रशिक्षण दिनांकठिकाण ११६ जून २०१७पेण २१७ जून २०१७अलिबाग ३१८ जून २०१७मुरूड४१९ जून २०१७रोहा५२० जून २०१७नागोठणे६२१ जून २०१७पाली-सुधागड७२२ जून २०१७माणगाव८२३ जून २०१७तळा९२४ ते २६ जून २०१७महाड१०२७ जून २०१७श्रीवर्धन व म्हसळा ११२८ जून २०१७पनवेल व उरण१२२९ जून २०१७कर्जत१३३० जून २०१७ खालापूरदरड कोसळण्याचा संभाव्य धोका असणारी गावेअ.क्र.तालुकागावेलोकसंख्या०१महाड३२९,८८८०२पोलादपूर२५११,२९२०३खालापूर०६१,९६६०४माणगांव०३१,१५३०५तळा०२३२२०६रोहा०४१,७२६०७पनवेल०२५७९०८सुधागड०११४५०९म्हसळा०४६६६१०तळा०२३२२११श्रीवर्धन०१२५६१२मुरुड०२९०७८४२०,३२९रायगड किनारी भागातील गावे अ.क्र.किनारा प्रकारगावलोकसंख्या१नदी किनारा२७३३,५८,१८४२समुद्र किनारा५३१,७३,४३४३खाडी किनारा८१९५,३५२१६ जून ते शुक्रवार ३० जून २०१७ या पंधरा दिवसांच्या कालावधीत रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यांत ‘एनडीआरएफ’चे प्रशिक्षण